सुशांत प्रकरण | CFSL अहवालानंतर विरोधक तोंडघशी पडणार? | सविस्तर वृत्त
नवी दिल्ली, २४ सप्टेंबर: अभिनेता सुशांत सिंह राजयूत याच्या मृत्युप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवण्याचा मोठा प्रयत्न केला गेला. जस्टीस फॉर सुशांत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय स्थिती अजूनच तापल्याचं पाहायला मिळालं.
मात्र काही दिवसांच्या चौकशीनंतर अचानक सुशांतच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयचा तपास थंडावल्याचं पाहायला मिळालं आणि अचानक केंद्रीय अमली पदार्थ खात्याची रियामार्फत या प्रकरणात इंट्री झाली. वास्तविक सुशांतचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या प्राथमिक तपासात समोर आल्याचं म्हटलं गेलं आणि त्यानंतर विषय पेटता ठेवण्यासाठी NCB’ला यात प्रवेश दिला गेला आणि त्यात कंगनासारखे प्यादे नियोजनबद्ध पद्धतीने वापरले गेल्याच निरीक्षण राजकीय विश्लेषकांकडून नोंदवण्यात आलं, मात्र केंद्रबिंदू महाराष्ट्र आणि मुंबई राहील याची विशेष काळजी घेतल्याचं राजकीय विश्लेषकांनी निरीक्षण नोंदवलं आहे. यानंतर पुढील काही दिवस बॉलिवूडच्या कलाकारांच्या आडून प्रसार माध्यमं व्यस्त ठेवली जातील, ज्यातून पुराव्यांचा विचार करता काहीच हाताला न लागण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र सुशांत प्रकरणी त्याचे कुटुंबीय आणि राजकीय समर्थक तोंडावर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मागील सव्वातीन महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुरू असलेला तपासाचा तिढा आता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबमधील CFSL) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. सीएफएसएलने सुशांत सिंह राजपूतच्या वांद्रे येथील राहत्या घरी क्राइम सीनचे रिक्रिएशन केले होते. त्यामध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे समोर आले. दरम्यान सीएफएसएलने आपला हा अहवाल सीबीआयला सुपूर्द केला आहे. मात्र या अहवालाला अधिकृत दुजोरा सीबीआयकडून लवकरच देण्यात येण्याची शक्यता आहे.
सीएफएसएलमधील सूत्रांच्या हवाल्याने न्यूज १८ हिंदीने हे वृत्त प्रसारित केले आहे. सीएफएसएलच्या अहवालामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे कारण पार्शियल हँगिंग असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ मृत्यू झालेल्या व्यक्तीचे पाय फाशीच्या दरम्यान पूर्णपणे हवेत नव्हते. तर त्याचा पाय जमिनीला लागत होता किंवा बेड किंवा स्टूलसारख्या कुठल्याही वस्तूला लागलेले होता. क्राइम सीनचे रिक्रिएशन आणि पंख्याला लटकलेल्या कपड्याच्या क्षमतेची चाचणी केल्यानंतर सीएफएसएलने हा अहवाल तयार केला आहे.
सूत्रांनी सांगितले की, सीएफएसएलच्या रिपोर्टमध्ये हे दिसून आले आहे की, सुशांतने आपल्या दोन्ही हातांनी फास लावून घेतला असावा. रिपोर्टनुसार सुशांतने आपल्या उजव्या हाताचा वापर स्वत:ला लटकवून घेण्यासाठी केला असावा. तसेच त्याच्या गळ्यावर पडलेल्या लिगेचर मार्कच्या गाठीच्या स्थितीचाही अॅनॅलिसिस रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. सरळ हाताचा वापर करणारी व्यक्तीच या प्रकारे फाशी लावून घेऊ शकते. सुशांतच्या खोलीमधून जप्त करण्यात आलेल्या कपड्याचा वापर फाशी लावून घेण्यासाठी करण्यात आल्याचेही रिपोर्टमधून उघड झाले आहे.
बॉलिवूडमधील उगवत्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सुशांत सिंह राजपूतने जून महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान सुशांतच्या मृत्यूबाबत संशय घेण्यात आला होता. तसेच सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली, असावी अशी शंकाही व्यक्त केली जात होती. त्याबरोबरच त्याच्या मृत्यूवरून राजकारणही पेटले आहे.
News English Summary: According to a report in News18, the Central Forensic Science Lab (CFSL) has found no evidence of murder. The team had recreated the crime scene of the Kedarnath actor a few hours before his demise and it suggests that Sushant Singh Rajput had committed suicide. The News18 report suggests that CFSL believes Sushant’s death was due to partial suicide. Partial Suicide happens when the deceased’s legs are not completely in the air. So, it could mean that his legs could be touching a bed, stool, or a table.
News English Title: Sushant Singh Rajput death case Big revelation from CFSL report Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News