22 November 2024 7:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत घोटाळा | तब्बल ५.३८ लाख फेक लाभार्थी

Big Scam, PM Kisan Samman Nidhi scheme, Modi government, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २४ सप्टेंबर: मोदी सरकारची गरिबांना लाभ पोहोचविणारी महत्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील घोटाळा उघड आला आहे. या योजनेसाठी पात्र नसलेले लोक या योजनेचा लाभ घेत होते, असे स्पष्ट झाले आहे. फुलप्रूफ सिस्टममध्ये सुद्धा लोक घोटाळा करू शकतील, असा विचारही कोणी करू शकणार नाही. ज्यावेळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील (PM Kisan samman nidhi Scheme) अवैधरित्या पैसे काढण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यावेळी अपात्र म्हणजेच बनावट लोकांची आकडेवारी पाहून सरकार सुद्धा आश्चर्यचकित झाले.

तामिळनाडूमध्ये ५.९५ लाख लाभार्थ्यांच्या खात्यांची चौकशी करण्यात आली. त्यामधील ५.३८ लाख लाभार्थ्यांची बनावट खाती असल्याचे निदर्शनास आले. आता संबंधित बँकांमार्फत बनावट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केलेली रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे, जेणेकरून ही रक्कम केंद्र सरकारच्या खात्यात परत येऊ शकेल आणि ती योग्य ठिकाणी वापरली जाऊ शकेल. आतापर्यंत ६१ कोटी रुपये वसूल झाले आहेत.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, ९६ कंत्राटी कर्मचार्‍यांच्या सेवा संपुष्टात आल्या आहेत. अपात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी जबाबदार आढळलेल्या ३४ अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई सुरू केली आहे. ३ गटस्तरीय अधिकारी व ५ सहाय्यक कृषी अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. हे लोक पासवर्डच्या दुरुपयोगासाठी जबाबदार असल्याचे आढळले. १३ जिल्ह्यात एफआयआर नोंदवून कंत्राटी कामगारांसह तब्बल ५२ जणांना अटक केली आहे.

भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने केंद्राशी सल्लामसलत करून स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम तयार करून यंत्रणा बळकट करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, खऱ्या शेतकरी कुटुंबांना ओळखण्याची राज्य सरकारांची पूर्ण जबाबदारी असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, तामिळनाडू सरकारने देखील हा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार तिथे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये तब्बल ११० कोटी रुपयांपेक्षा अधिक मोठा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याअंतर्गत ११० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली. या प्रकरणी एकूण १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

तामिळनाडूचे मुख्य सचिव गगनदीपसिंह बेदी यांनी या घोटाळ्याची माहिती दिली होती. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अचानक प्रमाणापेक्षा अधिक वाढली असल्याचे ऑगस्टमध्ये लक्षात आले असे बेदी म्हणाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार हा घोटाळा तामिळनाडूतील एकूण १३ जिल्ह्यांमध्ये झाला आहे. यात कल्लाकुरीची, विल्लुपुरम, कुडलूर, तिरुवन्नमलाई, वेल्लोर, राणीपेट, सालेम, धर्मपुरी, कृष्णागिरी आणि चेंगलपेट या जिल्ह्यांचा समावेश आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी राज्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये झालेल्या करोडोंच्या घोटाळ्यासाठी केंद्र सरकार दोषी असल्याचा आरोप केला होता. देशातील शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत तामिळनाडूमध्ये ११० कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. मात्र आता हा घोटाळा नक्की कशामुळे झाला यावरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी या योजनेमध्ये केंद्र सरकारने ‘सेल्फ रजिस्ट्रेशन’ची सोय उपलब्ध करुन दिल्याने घोटाळा झाल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्राने नुकतचं सेल्फ रजिस्ट्रेन्शन सुरु केलं. मात्र यामधून शेतकऱ्यांची सोय होण्याऐवजी फसवणूक केली जात असल्याची प्रकरणं समोर येऊ लगाली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं. तामिळनाडूमध्ये या योजनेसाठी पात्र नसणारे पण तिचा लाभ घेणारे पाच लाखांहून अधिक संक्षयित लाभार्थी आढळून आले आहेत. चुकीची माहिती देऊन या लोकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समजते.

 

News English Summary: The Modi government’s scam in the Prime Minister’s Farmers’ Honor Scheme, an ambitious scheme to benefit the poor, has come to light. It has become clear that people who were not eligible for the scheme were taking advantage of the scheme. Even in a foolproof system, no one would think that people could scam. At that time an inquiry was started into the case of illegal withdrawal of money from the Prime Minister’s Kisan Sanman Nidhi Scheme. At that time, the government was also surprised to see the statistics of ineligible people.

News English Title: Big alert for farmers more than 5 lac fake accounts in only one state under PM Kisan Samman Nidhi scheme now what will do Modi government Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x