19 April 2025 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

आसाम पोलीस भरती परीक्षा पेपरफुटी | भाजप नेत्याचं नाव येताच राज्य सोडून पलायन

Assam Police SI 2020, Exam Cancelled, Assam Police Recruitment, Marathi News ABP Maza

गुवाहाटी, २५ सप्टेंबर : आसाम पोलीस भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी नाव समोर आल्यानंतर राज्यातील वरिष्ठ भाजपा नेते दिबान डेका यांना आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. हेच कारण देत त्यांनी गुरुवारी आपण राज्य सोडलं आहे असं जाहीर केलं आहे. डेका यांनी कोणत्याही क्षणी माझी हत्या केली जाण्याची भिती वाटत होती असंही म्हटलं आहे. माझ्याविरुद्धात कट रचण्यात आला असून यामध्ये आसाम पोलीस खात्यातील अनेक वरिष्ठ भ्रष्ट अधिकाऱ्यांचाही समावेश आहे असा आरोपही डेका यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं आहे.

राज्य स्तरीय पोलीस भरती बोर्डाचे (एसएलपीआरबी) अध्यक्ष प्रदीप कुमार यांना २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका मिळाली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले.

आपण भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचा सदस्य असल्याचे सांगणाऱ्या डेका यांची आसाम पोलीस भरती प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी चौकशीही झाली आहे. आसाम पोलिसांच्या सीआयडीने आणि गुवहाटी पोलिसांनी डेका यांची चौकशी केली आहे. याच प्रकरणासंदर्भात पोलिसांनी गुरुवारी दुपारी माजी डीआयजी पी. के. दत्ता यांच्या घरावरही छापा मारला. दत्ता यांच्या मालकीच्या काही हॉटेल्स आणि राज्याच्या राजधानीत त्यांच्या मालकीच्या काही संपत्त्यांवरही पोलिसांनी छापे मारले.

अधिकाऱ्यांनी बुधावारी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार आसाममधील पोलीस खात्यातील उप निरीक्षक पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. यामध्ये राज्य सरकारमधील एक महिला कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. याच प्रकरणात इतर पाच जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये विशेष कार्य गटाच्या (एसटीएफच्या) एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. ज्या कंपनीला ही परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्या कंपनीशी माझा संबंध आहे असं डेका यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. माझ्या जिवाला धोका असल्याने मी राज्य सोडून निघून जात असल्याचे डेका यांनी स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: Assam Police SI 2020 Exam Cancelled. Police in Assam are probing the role of a retired Indian Police Service (IPS) officer for his alleged involvement in leaking question paper for a written examination for the post of sub-inspectors. Police are also investigating the roles of a senior Asom Gana Parishad (AGP) functionary and a Bharatiya Janata Party (BJP) leader as well for their roles in the question paper leak. Both parties are part of the ruling coalition in Assam.

News English Title: Assam Police SI 2020 Exam Cancelled Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या