राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी नाही | उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुंबई, २५ सप्टेंबर : नव्या कृषी विधेयकावरुन आज शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. विविध शेतकरी संघटनांनी अखिल किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशभरातील संघटनांनी नव्या कृषी विधेयकावर राग व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.
पंजाब बंदमध्ये 31 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखणे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. संसदेत समंत करण्यात आलेल्या तीन शेती विधेयकामुळे कृषी बाजाराची व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान राज्य सरकारकडून देखील या विधेयकांना विरोध असल्याचं समोर आलं आहे. ही विधेयक लागू करण्यासाठी ऐवढी घाई कशासाठी, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी आणि कामगार विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करण्यास आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या वतीने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना 51 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नव्या अत्याधुनिक ॲम्बुलन्स खरेदी करण्यात आले आहेत. या ॲम्बुलन्सचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, केंद्राचे कृषी विधेयक शेतक-यांचे फायद्याचे नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचे अस्तित्वात यामुळे धोक्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात या विधेयकाची अंमलबजावणी करण्यास आमचा विरोध आहे. परंतु अंमलबजावणी केली नाही तर काय परिणाम होतील, न्यायालयात गेले तर काय होईल याबाबत अभ्यास करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.
News English Summary: Farmer’s unions have called a nationwide strike today over the new agriculture bill. Organizations across the country have expressed outrage over the new agriculture bill. The state government has also expressed opposition to the bill. Explaining why there is such a rush to implement this bill, Deputy Chief Minister Ajit Pawar clarified that we are opposed to the implementation of the Agriculture and Labor Bill in the state.
News English Title: Deputy Chief Minister Ajit Pawar big announcement The Center has not implemented the Modi Govt Agriculture and Labor Bill Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार