Health First | शिळी चपाती खाल्ल्यावर होतात भरपूर फायदे | काय आहेत आरोग्यदायी फायदे
नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : असे म्हणतात कि प्रत्येक शिळे खाणे हे नुकसानकारक नसते, काही पदार्थ असेही असतात जे शिळे असूनही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ज्यातील एक आहे गहू. आज आम्ही तुम्हाला शिळी पोळी, शिळी चपाती खाण्याचे असे फायदे सांगणार आहोत जे ऐकल्यावर तुम्ही शिळी पोळी, शिळी चपाती टाकून देण्याऐवजी खाणे पसंत कराल.
खरेतर शिळे अन्न खाऊन शरीराचे नुकसानच होते असे म्हणतात. १२ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवलेले अन्न खाल्ल्याने पोटाचे विकार जडू शकतात. मग ते इतर काही पदार्थ असोत किंवा शिळी पोळी. इतकेच नाही तर शिळे अन्न पुन्हा गरम करून खाण्याने शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते.
पण हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल कि सगळेच शिळे पदार्थ नुकसानकारक नसतात. काही गोष्टी अशा असतात ज्या शिळ्या खाल्याने शरीराला फायदा होतो ज्यातील एक आहे गहू. भारतात बहुतांश घरांमध्ये गव्हाच्या पोळ्या केल्या जातात. तसेच अनेक भारतीय घरात जास्त जेवण बनवण्याची सवय असते ज्यामुळे बरेचदा पोळ्या उरतात. मग या उरलेल्या पोळ्या टाकून द्याव्या लागतात किंवा जनावरांना खाऊ घालाव्या लागतात.
दुधाबरोबर शिळी पोळी खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहाते. शिळी पोळी १० मिनिटे दुधात भिजवा आणि नाश्त्याला खा. असे केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहाते. जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास नेहमी होत असेल तर हा सोपा उपाय नक्की करून पहा. आपल्या शरीराचे साधारण तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते. तापमान ४० पेक्षा जास्त असेल तर आपल्या शरीराच्या महत्वपूर्ण अवयवांना नुकसान पोहोचू शकते. दुधात भिजवलेली शिळी पोळी शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवते.
जिमला जात असलेल्या लोकांनी शिळी चपाती खाल्ली तर फायदेशीर ठरते. अनेक फिटनेस सेंटमध्ये सकाळी शिळी चपाती खाण्याचे फायदे दिले जातात. यात असणारे बॅक्टिरीया शरीर चांगलं ठेवण्यासाठी लाभदायक ठरत असतात. नियमित शारीरिक कसरत किंवा व्यायाम भरपूर करतात. अश्या व्यक्तींसाठी शिळ्या चपातीचे सेवन हे शरीराला त्वरित उर्जा देणारे आहे.
ज्या लोकांना नेहमी पोटदुखीची तक्रार असते त्यांच्यासाठी शिळी पोळी खूप उत्तम असते. रात्री झोपण्याआधी दुधात भिजवलेली शिळी पोळी खाऊन गैस किंवा बद्धकोष्ठता यांसारखे पोटाचे विकार दूर होतात. ही पोळी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी खाऊ शकता.
सध्याच्या काळात अनियमीत जीवशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकिच्या पद्धतींमुळे एसिडिटीची समस्या अनेकांना जाणवत असते. या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी दुधासोबत शिळी चपाती खा. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळतो. तसंच अशक्तपणा जाणवत असेल तर शिळ्या चपातीच्या सेवनाने अशक्तपणा कमी होतो. ज्यांना गॅस आणि पचनाच्या समस्या आहेत. त्यांच्यासाठी शिळी चपाती हा खूप चांगला उपाय आहे. तसेच गव्हाच्या पोळीमध्ये असणारे फायबर अन्न पचनासाठी देखील फायदेशीर आहे.
डायबिटीजमध्ये शिळी पोळी खाण्याचा बराच फायदा होतो. दिवसात कोणत्याही वेळी शिळी पोळी १० ते १५ मिनिटे दुधात भिजवून खाल्ल्याने ब्लड शुगर पातळी नियंत्रणात राहाते. म्हणूनच शिळ्या पोळ्या कधीही टाकून देऊ नका, त्या दुसर्या दिवशी खाऊन तुमचाच फायदा होणार आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)
News English Summary: The number of calories in chapati is also on the lower side which is good if you want to lose weight. Chapatis can be a part of a weight loss diet and it can keep you satiated for hours. The high protein and fiber content also add a lot of value to the bread making it an integral part of your diet. Take a look at some of the health benefits of chapati below. A Roti (chapati) is a powerhouse of nutrients. You could get it all from this bread – Vitamin B, E & minerals such as copper, zinc, iodine, manganese, silicon, potassium, calcium and other mineral salts. Thus, a single piece of chapati (wheat) can definitely do wonders for your health.
News English Title: Health benefits eating chapati Indian bread Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS