25 November 2024 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

चरस-गांजा संबंधित विधानावरून जावेद अख्तर यांच्याविरोधात एनसीबीकडे तक्रार

Complaint, lyricist Javed Akhtar, Baramati, NCB

बारामती , २८ सप्टेंबर : आपल्या देशात चरस, गांजा, भांग ओढणे याला गुन्हा मानत नाहीत. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, असे वक्तव्य गीतकार जावेद अख्तर यांनी मराठी वृत्त वाहिनीवर केले. त्याविरोधात बारामती येथील अ‍ॅड. भार्गव पाटसकर यांनी नार्कोटिक्स नियंत्रण ब्युरो (एनसीबी) कडे जावेद अख्तर यांच्यावर कारवाई करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.

शनिवारी अख्तर हे मुलाखतीत रिया चक्रवर्ती प्रकरणासंदर्भात बोलताना म्हणाले, चरस, गांजा, भांग यांचे सेवन करणे हा काही गुन्हा नाही. मात्र, आपल्याकडे एनडीपीएस कलम २७ नुसार गांजा, चरस सेवन करणे अपराध आहे. त्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटसकर यांनी केली आहे.

दरम्यान, नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणाचा संबंध ड्रग्स कनेक्शनशी असल्याच स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू होती आणि ही चौकशी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख राकेश अस्थाना करत होते. पण आता अशी माहिती मिळाली की राकेश अस्थाना पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. अस्थाना रवाना झाले असले तरीही कुणालाही क्लीन चिट मिळालेली नाही.

राकेश अस्थाना जाताना अधिकाऱ्यांना काही सूचना देऊन गेल्याचं कळत आहे. ज्यात तपासाची दिशा काय असेल याचे निर्देश दिले ,कोणालाही क्लीन चिट दिली नाही, तपास सुरू आहे. पण तपास सुरू असताना राकेश अस्थाना दिल्लीला गेल्यामुळे सगळ्यांच लक्ष तिकडेच केंद्रीत झालं आहे.

 

News English Summary: In our country, smoking Charas, Ganja and cannabis is not considered a crime. This is a part of our culture, said lyricist Javed Akhtar on Marathi news channel. On the other hand, Adv. Bhargava Patskar has written to the Narcotics Control Bureau (NCB) seeking action against Javed Akhtar.

News English Title: Complaint against lyricist Javed Akhtar at Baramati Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x