22 November 2024 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

KEM'मध्ये कोविड लस चाचणी | स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यास १ कोटी भरपाई

KEM hospital, Serum, covid19 vaccine, human test began

मुंबई, २८ सप्टेंबर : ऑक्सफर्ड विद्यापीठ-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ लशीची मुंबईत चाचणी सुरु झाली आहे. केईएम रुग्णालयात शनिवारी तिघा स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात आली. संपूर्ण भारतात निवडक दहा केंद्रात १६०० स्वयंसेवकांवर या लशीचा प्रयोग केला जाणार आहे. केईएम रुग्णालयात शनिवारी सकाळी तिघा स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. दुपारपर्यंत या तिघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.

जीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आहे तसेच शरीरात अ‍ॅन्टिबॉडीज तयार झालेल्या नाहीत. अन्य कोणते आजार तसेच कोमॉर्बीड नसलेली सशक्त व्यक्तीच अशा चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत. ‘कोव्हीशिल्ड’ चाचणीची घोषणा केली तेव्हा तात्काळ ३५० लोकांनी या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून आपली नावे नोंदविल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. एथिक्स समितीने काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यात चाचणी दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास अथवा आजारी पडल्यास त्याला विमा संरक्षण म्हणजेच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.

समितीच्या सर्व आक्षेपांची पूर्तता करण्यात आली असून चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यास एक कोटी रुपये भरपाई विम्याच्या माध्यमातून मिळेल. स्वयंसेवक आजारी पडल्यास ३८ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण असणार आहे. शनिवारी तिघा स्वयंसेवकांना लस देण्यात आल्यानंतर आणखी दहा जणांची फिटनेस चाचणी करण्यात आली आहे.

ज्या तिघांना लस देण्यात आली त्यांच्यावर नियमितपणे डॉक्टर लक्ष ठेवून राहाणार आहेत. तसेच या तिघांना २९ व्या दिवशी दुसरा डोस देण्यात येणार आहे. केईएममध्ये १६० स्वयंसेवकांवर चाचणी करण्याची परवानगी मिळाली असली तरी पहिल्या टप्प्यात १०० जणांवरच चाचणी केली जाणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले. चाचणी केलेल्या सर्वांची नावे गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील नायर रुग्णालयातही या लशीची चाचणी होणार आहे.

दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्या आता तब्बल ६० लाख एवढी झाली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. दरम्यान, मागील २४ तासात तब्बल १०३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू (Corona Patient Death) झाला आहे. आतापर्यंत देशात ९५ हजारांहून जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात देशात ८२ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह (Positive Patient) रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ६० लाखांच्या पुढे गेली आहे. यापैकी ९ लाख ६२ हजार अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत.

देशात आतापर्यंत एकूण ९५ हजारांहून जास्त कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ६० लाखांच्या देखील पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ६०,७४,६४० रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी ९५,५४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: The government-run KEM Hospital here on Saturday will administer, as part of human trial, Oxford University’s Covishield vaccine for coronavirus to three persons, said hospital Dean Dr Hemant Deshmukh. “We have screened 13 persons so far including 10 today, of which three will get the first shot of Oxford University-AstraZeneca developed Covishield vaccine on Saturday,” he said.

News English Title: Mumbai KEM hospital Serum covid19 vaccine human test began Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x