22 November 2024 7:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

६ वर्ष लष्कराला खराब दर्जाचा दारुगोळा | ९६० कोटी वाया गेले | लष्कराचा अंतर्गत रिपोर्ट

Money Burnt, Faulty Ammo, Howitzers,  Fumes Army

नवी दिल्ली, २९ सप्टेंबर : मागच्या सहावर्षात सरकारी मालकीच्या ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाचा दारुगोळा  (dangerously faulty ammunition) खरेदी करण्यावर भारतीय लष्कराचा निधी मोठया प्रमाणात खर्च झाला आहे. इतक्या पैशात मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या. संरक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात हा दावा करण्यात आला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

२०१४ ते २०२० दरम्यान ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्डाकडून खराब दर्जाचा दारुगोळा पुरवण्यात आला. त्यामुळे ९६० कोटी रुपयांचे नुकसान झाले. “९६० कोटी म्हणजे इतक्या पैशात १५५ एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या शंभर तोफा खरेदी करता आल्या असत्या” असे लष्कराच्या नोटमध्ये म्हटले आहे.

ऑर्डिनन्स फॅक्ट्री बोर्ड हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. तसेच ही संस्था जगातील सर्वात जुन्या सरकारी ऑर्डिनन्स प्रॉडक्शन युनिटमधील एक आहे. या अंतर्गत लष्करासाठी दारुगोळा तयार केला जातो. या ऑर्डिनन्स बोर्डाकडून मिळालेल्या २३ एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल, १२५ एमएम टँक राऊंडसह वेगवेगळ्या प्रकारच्या कॅलिबर बुलेटचा समावेश आहे.

निकृष्ट प्रकारच्या दारुगोळ्यामुळे केवळ आर्थिक नुकसान झालेले नाही तर जीवितहानीसुद्धा झालेली आहे. सरासरीत सांगायच झाल्यास निकृष्ट दारुगोळ्यामुळे आठवड्याला एक अपघात होतोय, असे लष्कराच्या या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. २०१४ पासून निकृष्ट प्रकारच्या दारुगोळ्यामुळे ४०३ च्या आसपास अपघात झाले आहेत. यामध्ये २७ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १५९ जवान जखमी झाले आहेत. यावर्षीसुद्धा आतापर्यंत १३ अपघात झाले आहेत. मात्र त्यात कुणाचा मृत्यू झालेला नाही.

 

News English Summary: he Indian Army funds spent on dangerously faulty ammunition supplied by the state-owned Ordnance Factory Board (OFB) over the last six years would have been enough to purchase 100 medium artillery guns. This staggering claim has been made in an internal Army report to the Ministry of Defence (MoD), excerpts of which have been accessed by India Today.

News English Title: Money Burnt On Faulty Ammo Could Have Bought Us 100 New Howitzers Fumes Army Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x