22 November 2024 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सुशांतप्रकरणी CBIने काय दिले लावले | शरद पवारांचा संतप्त सवाल

NCP President Sharad Pawar, CBI Probe, Sushant Singh Rajput Case

पंढरपूर, २९ सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले. तसंच नंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. मात्र अद्याप या आत्महत्या प्रकरणाच्या तपास पूर्णत्वास आला नसल्याने टीका करण्यात येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘अभिनेत्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचं काम मुंबई पोलीस करत होते. पण मुंबई पोलीस हे काम करतील, यावर केंद्र सरकारला विश्वास नसावा. त्यामुळे त्यांनी वेगळी एजन्सी नेमली. मात्र या एजन्सीने काय दिवे लावले, ते आम्हाला दिसले नाहीत. त्याचा प्रकाश काही बघायला मिळाला नाही. आता ते सगळं भलतीकडेच चाललं आहे,’ असं म्हणत शरद पवार यांनी सीबीआय तपासावर टीका केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जूनला त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर बॉलिवूडच्या कंपूशाहीमुळे त्याचा बळी गेला आहे अशी टीका होऊ लागली. अभिनेत्री कंगना रणौतने तर सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या नसून खून आहे असं वक्तव्य केलं. तसंच घराणेशाही आणि कंपूशाही यामुळे सुशांतला आत्महत्या करावी लागली असंही म्हटलं. या संदर्भातल्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्येही झळकल्या. ज्यानंतर या प्रकरणी मुंबई पोलिसांनी लक्ष घालून तपास सुरु केला. मात्र यावरुन राजकारण चांगलंच रंगलं होतं. भाजपाने केलेल्या मागणीवरुन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं.

 

News English Summary: Bollywood actor Sushant Singh Rajput’s suicide case has led to serious allegations against Mumbai police and the state government. The case was later handed over to the CBI. However, as the investigation into the suicide case has not been completed yet, NCP President Sharad Pawar has also lashed out.

News English Title: NCP President Sharad Pawar Comment On CBI Probe In Sushant Sing Rajput Case Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x