शिवसेनेत जातीपातीचं राजकारण | गंभीर आरोप करत शिवसैनिकाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर, २९ सप्टेंबर : शिवसेनेतील अंतर्गत वाद आला चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेत जातीपातीचं राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं केला आहे. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. नाराज पदाधिकाऱ्यानं याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. मनपा स्वीकृत नगरसेवक निवडीत शिवसेनेत जातीचं राजकारण केले जात असल्याचे या पत्रात स्पष्ट केलं आहे.
या पत्रात चंद्रकांत शेळके म्हणतात की, अहमदनगरमध्ये गुरुवारी स्वीकृत नगरसेवक भरणार आहेत, आजपर्यंत अनिल भैय्या राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण शिवसेनेत केले नाही, त्यामुळे अहमदनगर येथील शिवसेना संघटना बळकट राहिली, परंतु काही दिवसांपासून याठिकाणी जातीचे राजकारण सुरु आहे. या राजकारणातून अनिल राठोड यांना पराभूत केले होते, आजही स्वीकृत नगरसेवकाच्या वेळी जातीचे राजकारण करुन दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच आपण यात लक्ष घालावं नाहीतर अहमदनगरची शिवसेना एकतर भाऊ कोरेगावकर आणि काही जातीवादी फुटीर शिवसैनिकांनी आपल्या पक्षाला गळती लावायचं काम करुन राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने लक्ष घालावे, व अहमदनगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसपूस थांबवावी अन्यथा या पुढील काळात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागणार आहे असंही चंद्रकांत शेळके यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.
शिवसेनेत जातीपातीचं राजकारण; शिवसैनिकाचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिलं पत्र pic.twitter.com/K3QQ7venEV
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) September 29, 2020
News English Summary: Shiv Sena’s internal dispute has come to the fore. A Shiv Sena office bearer has made a serious allegation that caste politics is going on in the Shiv Sena. This has created a stir in the political circles of the city. The disgruntled office bearer has written a letter directly to Chief Minister Uddhav Thackeray expressing his grief. It has been clarified in this letter that caste politics is being carried out in Shiv Sena in the election of Municipal Corporation sanctioned corporator.
News English Title: Caste Politics Shivsena Ahmednagar Shivsena worker writes letter to CM Uddhav Thackeray Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP