22 November 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

धार्मिक अध्यात्म | शुभ कार्यांमध्ये नारळ फोडण्याचे नेमके महत्त्व | जाणून घ्या

Coconut, Hindu poojas, spiritual meaning, Religious Adhyatma

घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडला जातो. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगळदायी मानले गेले आहेत. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

नारळ गणपतीला अर्पण केलं जातं. नंतर त्याला प्रसाद म्हणून वाटप केलं जातं. हे एक पवित्र फळ आहे त्यामुळे देवाला अर्पण केलं जातं.

कोणतेही कार्य करण्यासाठी नारळच का अर्पण केलं जातं? नारळाचं का फोडलं जातं? तर याचे कारण असे की ऋषी विश्वामित्र नारळाचे निर्माते मानले गेले आहे. ह्याचा वरील कडक भाग हे दर्शवते की कुठल्याही कार्याच्या यशाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणारच.

नारळ वरून कडक आणि आतून सौम्य कोमल असतं. ह्या मधील पाणी पवित्र मानले गेले आहे. नारळ गणपतीला अतिप्रिय आहे. त्यासाठी त्यांना काहीही नवे कार्याच्या शुभारंभाच्या आधी नारळ फोडून त्यामधील पवित्र पाणी सर्वत्र शिंपडले जातं. जेणे करून नकारात्मक शक्तीचा ह्रास होतो.

नारळ स्वतःच्या अहंकाराचे प्रतीक असतं. नारळ शरीराचे प्रतिकात्मक असतं. नारळ फोडणे म्हणजे आपण स्वतःला संपूर्ण विश्वात समरस केले आहे. यावर असलेले तीन डोळे भगवान शंकराचे डोळे मानले जाते. ज्यामुळे आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होते.

संस्कृत मध्ये नारळाला ‘श्रीफळ’ असे म्हटले जाते. श्री चा अर्थ लक्ष्मी असे. पौराणिक मान्यतेनुसार लक्ष्मीशिवाय कुठलेही शुभ कार्ये होत नाही आणि शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. नारळाच्या झाडाला संस्कृत मध्ये ‘कल्पवृक्ष’ असे ही म्हटले जाते. कल्पवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करते. पूजेनंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना दिला जातो.

 

Article English Summary: Coconut Known as “Narikela” in Sanskrit, Where ‘Nari’ means water and ‘Kela’ is fruit. We have seen the usage of coconut in many ways, but in India, the coconut is largely used for poojas. You have seen many people and pujaris break the coconut in front of deities. You can find that the coconut is the most demanded item that we brought for worship. Everything that we put for worship has its own spiritual significance. Just like Coconut also has its own spiritual significance while we break it in front of worship. Rishi Vishwamitra is considered to be the procedure of coconut, where it defines that the upper part of the coconut shows that you have to work hard enough to achieve success in any work.

Article English Title: Coconut is largely used for Hindu poojas spiritual meaning article.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x