22 November 2024 12:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आठवलेंनी हेच समर्थन हाथरसमधील बलात्कार पीडित व तिच्या परिवाराला दिलं असतं तर

Bollywood actress, Swara Bhasker, Minister Ramdas Athawale, Payal Ghosh

मुंबई, ३० सप्टेंबर : माणुसकीला काळिमा फासणारी हृद्यद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gangrape) जिल्ह्यामध्ये घडली. जेथे 4 नराधमांनी 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने गंभीर जखमी झालेली या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून लोकांमधून संतापाची लाट उसळत आहे. सोशल मिडियावरही लोक या घटनेचा निषेध करत आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार पार्थिव घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे.

देशात एवढी मोठी घटना घडलेली असताना रामदास आठवले मात्र इतर विषयात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वरा भास्करने रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे. रामदास आठवले यांनी अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या अभिनेत्री पायल घोषला समर्थन दिलं. यावरून स्वरा भास्कर म्हणाली की, चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेपच्या पीडितेला आणि तिच्या परिवाराला समर्थन दिलं असतं.

स्वरा भास्करने तिच्या ट्विटर हॅंडलवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात पायल घोष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वकिल नितीन सातपुते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे एकत्र दिसत आहेत. या फोटोसोबत स्वराने लिहिले की, ‘जर मंत्री आठवले यांनी हेच समर्थन हाथरसमधील बलात्कार पीडितेला आणि तिच्या परिवाराला दिलं असतं तर चांगलं झालं असतं’.

 

 

News English Summary: The bold and beautiful actress Swara Bhasker, known for speaking her mind out, recently took a dig at Rajya Sabha MP Ramdas Athawale. Ramdas was earlier seen meeting Maha Governor Bhagat Singh Koshiyari along with actress Payal Ghosh, as he is supporting her in the fight against filmmaker Anurag Kashyap. Swara posted a tweet stating that it would have been great if Ramdas Athawale extended the same support to the Hathras gangrape victim and her family too.

News English Title: Bollywood actress Swara Bhasker takes dig at Minister Ramdas Athawale supporting Payal Ghosh Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x