युपीत महिला अत्याचार सुरूच | सामूहिक बलात्कारानंतर दलित मुलीचे पाय तोडले

बलरामपूर, १ ऑक्टोबर: उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या धक्क्यांतर नागरिक सावरलेलेही नसताना युपीतील बलरामपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी एका २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
दोन मित्रांनी मैत्रीच्या बहाण्याने दलित मुलीला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिची कंबर आणि पाय मोडले गंभीर अवस्थेत असलेल्या या मुलीला रिक्षातून घरी पाठवले. नंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तिला आधी इंजेक्शन दिलं गेलं आणि मग तिच्यावर आत्याचार केला गेला, असा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. प्रचंड वेदना होत आहेत. आता मी वाचू शकणार नाही, असं गंभीर अवस्थेत आलेल्या मुलीने मृत्युपूर्वी म्हणाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.
महिलेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती घरी परत येत असताना तिचे अपहरण केले. बेशुद्ध अवस्थेत ती रिक्षातून घरी परत आली. तिची अवस्था वाईट झालेली होती. तिला उभी राहण्याची ताकदही नव्हती. अत्याचार करणाऱ्यांनी तिचे घरी येत असताना अपहरण केले, असा दावा पीडितेच्या कुटूंबाने केला आहे. मुलीची प्रकृती पाहून पालक काळजीत पडले आणि त्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु तिचे रुग्णालयात जात असतानाच निधन झाले.
२२ वर्षीय पीडित तरुणीवर तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिला विषाचे इंजेक्शन देखील देण्यात आले होते, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ही मुलगी मंगळवारी वेळेवर घरी आली नाही म्हणून त्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. काही काळानंतर ती हाताला ग्लूकोज ड्रिपसह रिक्षातून घरी आली. त्यावेळी तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. बलरामपूर पोलीस अधीक्षक देव रंजन वर्मा यांनी सांगितले की, नातेवाईकांनी तिला रूग्णालयात नेले पण तिचा वाटेवर मृत्यू झाला.
News English Summary: A 22-yr-old Dalit woman died after she had allegedly been gang-raped by two youths in a Balrampur village in Uttar Pradesh on Wednesday, said police. The victim was cremated on Wednesday night itself after post-mortem by a panel of four doctors. The incident occurred on Tuesday when the girl had gone to take admission in a college near her village but did not return home till late evening, superintendent of police of Balrampur, Dev Ranjan Verma, said.
News English Title: Uttar Pradesh Balrampur Dalit girl allegedly gang raped victim died Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA