22 November 2024 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

भाजपाचा नारा बेटी बचाओ नाही | तथ्य लपवा आणि सत्ता वाचवा - राहुल गांधी

Congress MP Rahul Gandhi, Uttar Pradesh, Yogi Government, Hathras Gangrape

लखनऊ, १ ऑक्टोबर: हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा विशेष पथकाकडे देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सत्यम दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीआय अथवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तपास पथकाने याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशऐवजी दिल्ली पोलिसांकडे हा तपास देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्कार आणि अमानुष हत्येच्या घटनेतील पीडित दलित मुलीचे कुटुंबीय अद्यापही भीतीच्या छायेखाली आहे. “काहीही घडू शकतं, आम्हाला सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे गाव सोडण्याचा विचार आहे,” असं पीडितेच्या भावानं म्हटलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

पीडितेच्या भावानं म्हटलं, “आम्ही या गावात सुरक्षित नाही. ते आमच्यासोबत काहीही करु शकतात. आमचा पोलिसांवर आणि प्रशासनावर विश्वास नाही. आम्हाला आता अधिकच भीती वाटू लागली आहे. आम्ही आता यापूर्वीपेक्षा त्यांच्या अधिकच रडारवर आहोत. ते आम्हाला जीवंत सोडणार नाहीत. त्यामुळे आम्ही आता गावही सोडू शकतो. आमचा राजकारण्यांवरही विश्वास नाही.” दुसरीकडे बलरामपूरमध्ये देखील एका युवतीवर गँगरेप करण्यात आला असून तिचे पाय देखील तोडण्यात आले आहेत. त्यानंतर या पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे.

या परिस्थितीला अनुसरून राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. यासंदर्भात ट्विट मध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘यूपीच्या जंगलराजमध्ये मुलींचा आणि सरकारवरील छळ हा अजूनही सुरूच आहे. कधीही जिवंत असताना सन्मान दिला नाही आणि त्यानंतर अंत्यसंस्काराचा अधिकार देखील काढून घेतला. भाजपाची घोषणा ‘मुलगी वाचवा’ नाही, तर ‘तथ्य लपवा, सत्ता वाचवा’, अशी आहे.

 

News English Summary: Following this situation in Hathras and Balrampur, congress leader Rahul Gandhi has criticized the Yogi government of Uttar Pradesh. In this regard, he said in a tweet that, ‘The harassment of girls and the government is still going on in Jangalraj, UP. He was never honored while alive, and later withdrew his right to a funeral.

News English Title: Congress MP Rahul Gandhi criticized Uttar Pradesh Yogi Government after Hathras Gangrape Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#UttarPradesh(13)#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x