22 November 2024 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आजपासून मुंबईमध्ये टोल दरात वाढ | टोल दर वाढीविरोधात मनसे आक्रमक

Mumbai toll rates increase, New rates

मुंबई, १ ऑक्टोबर: आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून मुंबई (Mumbai) मधील टोल दरात (Toll Rates) वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांना 5 ते 25 रुपयांपर्यंत टोल भरावा लागणार आहे. वाढलेले नवे दर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कायम राहणार आहेत. मुंबई (Mumbai), मुलुंड (Mulund), वाशी (Vashi), ऐरोली (Airoli) आणि दहिसर (Dahisar) मधून मुंबई एंट्री पॉईंट बुथवर (Mumabi Entry Point Booth) 1 ऑक्टोबरपासून टोलदर वाढणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रवासी कारच्या एकतर्फी प्रवासासाठी 35 रुपये मोजत होते. त्याऐवजी आता 40 रुपये टोल भरावा लागणार आहे. 35 रुपयांचा टोल गेल्या 6 वर्षांपासून लागू होता.

राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, एमएमआर क्षेत्रात 55 उड्डाणपूल बांधकामाचा खर्च वसूल करण्यासाठी 2002 ते 2027 या कालावधीत 25 वर्षे टोल वसुली करण्यात येणार आहे. मुंबई एन्ट्री पॉईंट टोल लिमिटेड (एमईपीएल) ला 2027 पर्यंत 11,500 कोटी रुपयांचा निधी टोल वसूलीतून मिळण्याची आशा आहे.

याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईत आजपासून टोलचे दर वाढले आहेत. आधीच महागाई आणि कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना वाढलेल्या टोल दरांचा सामना करावा लागणार आहे. आजपासून टोलच्या दरात ५ ते २५ रूपयांची वाढ झाली आहे. याविरोधात मनसेने आंदोलन केले. काही वाहनांना पैसे देऊ नये, असे सांगत गाड्या टोलनाक्यावरुन मार्गस्थ केल्या.

मुंबईतील टोल दरवाढीविरोधात मनसेने टोल नाक्यावर आंदोलन केले. नवी मुंबईतल्या ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन करून टोल रद्द करण्याची मागणी मनसेनं केली आहे. टोल मासिक पासाचे दरही वाढतील. त्यामुळे महागाईत अधिकच भर पडेल. एकीकडे रोज वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना सर्वसामान्य मुंबईकरांना आता मुंबईत प्रवेश करण्यासाठी वाढीव दराने टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले, असे मनसेकडून सांगण्यात आले.

 

News English Summary: The toll of Rs.35 has been constant for six years. The new rates will be applicable till September 30, 2023. For light commercial vehicles (LCVs), the toll has been increased by Rs.10 one-way to Rs.65, and for trucks and buses by Rs.25 each way to Rs.130. For multi-axle vehicles (MAVs), the increase is of Rs25 to Rs160.

News English Title: Mumbai toll rates increase from today checkout new rates Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#TollMuktMaharashtra(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x