18 November 2024 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

MPSC परीक्षा आरक्षणाच्या निकालापर्यंत पुढे ढकला | अन्यथा परीक्षा उधळून लावू

MPSC exam 2020, MPSC Prelim Exam 2020, Maratha Kranti Morcha, Supreme Court

मुंबई, १ ऑक्टोबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० (MPSC Prelims 2020 Exam) साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संदर्भात आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

कोरोना आपत्तीमुळे अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली होती आणि त्यानंतर उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होऊ लागल्याने आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केलं होतं. मात्र आता उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं देखील उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगापुढे दुसरी मोठी समस्या उभी राहिली आहे.

मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाचा निकाल येत नाही तोपर्यंत MPSC परीक्षा पुढे ढकलाव्या अन्यथा थेट परीक्षा केंद्रांवर धडक देऊन परीक्षा उधळून लावू असा इशाराच राज्य सरकारला दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात टीव्ही वृत्तवाहिन्यांना कॉल करून माहिती सरकार पर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे उमेदवारांसहित, राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची चिंता वाढली आहे.

 

News English Summary: The Maratha Kranti Morcha has warned the state government to postpone the MPSC exams till the result of the reservation, otherwise it will disrupt the exams by hitting the examination centers directly. Representatives of Maratha Kranti Morcha have called TV news channels and conveyed the information to the government. Therefore, the tension of the state government and the Maharashtra Public Service Commission, including the candidates, has increased.

News English Title: MPSC Prelims 2020 Exam have to postpone said Maratha Kranti Morcha to state government Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x