22 November 2024 10:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Hathras gangrape | राहुल आणि प्रियंका गांधी पायी चालत हाथरससाठी रवाना

Congress Leaders Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra, Hathras, Uttar Pradesh

लखनऊ, १ ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.

संतापाची लाट उसळली असताना उत्तर प्रदेशात त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आल्याने १४४ हे कलम लागू केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राहुल-प्रियंका गांधी यांना एक्स्प्रेस वेवर रोखले.

हाथरस येथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत होतं. यामध्ये उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडण्यात आल्याचे सांगितले जात आहे व पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल गांधी जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांच्यासोबत काही काँग्रेस कार्यकर्ते व नेतेही होते. मात्र अशाही परिस्थितीत राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले…’कितीही झालं तरी मी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही’, असे ते यावेळी पोलिसांना सांगत होते. या धक्काबुक्कीत मोठा जमाव येथे उपस्थित होता. त्यांच्या या धक्काबुक्कीची व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

 

 

News English Summary: Rahul Gandhi and sister Priyanka Gandhi have set off on foot to meet the family of Hathras gangrape victim after the Uttar Pradesh Police stopped them at Yamuna Expressway, citing imposition of Section 144, which prohibits assembly of four or more people. Congress workers milled around the two leaders as Rahul Gandhi, his face mask on, led the march, with Priyanka, who was recently retained as general secretary in charge of Uttar Pradesh, right behind him.

News English Title: Congress Leaders Rahul Gandhi And Priyanka Gandhi Vadra Leave For Hathras In Uttar Pradesh Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x