22 November 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

अनुरागने ऑगस्ट 2013 मधील पुरावेच दिले | थयथयाट करत पायलकडून मोदी-शहांना टॅग

Filmmaker Anurag Kashyap, Payal Ghosh, Mumbai Police, Bollywood Casting Couch

मुंबई, २ ऑक्टोबर : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. सोबतच तिने एफआयआरदेखील दाखल केला होता. परिणामी या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनुरागची तब्बल आठ तास चौकशी केली. त्यानंतर अनुरागच्या वकील प्रियंका खिमानी यांनी या प्रकरणासंदर्भात एक स्टेटमेंट जारी केले आहे. अनुरागवर केलेले सर्व आरोप या स्टेटमेंटमध्ये फेटाळून लावण्यात आले आहेत.

ऑगस्ट 2013 मध्ये अनुरागने आपल्याला घरी बोलावले आणि आपल्यासोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचे पायल घोषने आपल्या आरोपांत म्हटले आहे. मात्र तिचा हा आरोप मुळातच खोटा आहे. कारण 2013 च्या संपूर्ण ऑगस्ट महिन्यात माझे अशील (अनुराग कश्यप) अनुराग सिनेमाच्या शूटिंगसाठी श्रीलंकेत होते. त्यासंदभार्तील दस्ताऐवजांचा पुरावा त्यांनी दिला आहे. कश्यप यांनी आरोप करण्यात आलेली अशी काही घटना घडलीच नसल्याचे सांगितले आहे आणि त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत, असे वकीलांनी या स्टेटमेंटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.

न्यायालयीन प्रक्रियेच्या निकालाची पर्वा न करता अनुराग कश्यप यांना बदनाम करण्याच्या हेतूने ही कथित 2013 ऑगस्टमधील घटना उघडकीस आणली गेली. कश्यप यांना विश्वास आहे की ही चुकीची तक्रार लवकरच उघडकीस येईल, असा विश्वासही वकीलांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे अनुराग कश्यप यांना आणि त्यांचे कुटुंबीय-मित्रपरिवार यांना प्रचंड त्रास झाला. कश्यप यांनी या घटनेचा तीव्रपणे निषेध केला आहे. त्यांनी घोष यांच्यावर न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग केल्याबद्दल आणि तिच्या सुप्त हेतूंसाठी मी टू चळवळीचा वापर केल्याबद्द कारवाई करण्याची मागणी केली आहे, असेही स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, अनुराग खोटं बोलतोय असं म्हणत तिने पुन्हा एकदा त्याच्यावर निशाणा साधला आहे. “अनुराग पोलिसांसमोर खोटं बोलतोय. त्याच्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी त्याची नार्को अॅनालिसिस, लाइ डिटेक्टर आणि पॉलिग्राफ टेस्ट करावी. न्याय मिळवण्यासाठी आम्ही पोलिसांना एक विनंती अर्ज देखील करणार आहोत.” अशा आशयाचं ट्विट करुन पायलने अनुरागवर जोरदार टीका केली आहे. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना देखील टॅग केलं आहे.

 

News English Summary: Anurag Kashyap was summoned by the Mumbai police for questioning after Payal Ghosh filed an FIR against the filmmaker alleging offences of wrongful restrain, wrongful confinement, and outraging the modesty of women. Anurag Kashyap denied all the allegations as he was questioned for nearly eight hours at the Versova Police station. The filmmaker’s lawyer Priyanka Khimani later issued a statement regarding the same, “Mr. Kashyap has denied all wrongdoing in the matter and has provided his statement to the police. The material provided by Mr. Kashyap, in support of his statement, demonstrates that the complaint of Ms. Ghosh is an outright lie.

News English Title: Filmmaker Anurag Kashyap Payal Ghosh Mumbai Police Bollywood Casting Couch Incidents Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x