22 November 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

हाथरसच्या पीडित कुटुंबाला भेटण्यापासून मला रोखू शकत नाही | आज पुन्हा जाणार

Rahul Gandhi, Priyanka Gandhi, Hathras again, Meet gang rape victims family

लखनऊ, ३ ऑक्टोबर : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसला जाणार आहेत. याआधी राहुल आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांनी गुरुवारी पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना उत्तर प्रदेश सरकारने रोखले होतं. यावेळी राहुल गांधी यांना जोरदार धक्काबुक्कीही करण्यात आली होती. मात्र आता आज पुन्हा एकदा राहुल गांधी दुपारी हाथरसला जाणार आहेत. त्यामुळे आज तरी त्यांना जाण्याची परवानगी मिळते का हे पाहावे लागेल.

आज हाथरसला मीडियाला परवानगी देण्यात आली. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांना आक्रोश प्रथमच जगासमोर आला. आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. बहिणीवर बलात्कार झाला आहे असे सांगून तिने काय गुन्हा केला म्हणून तिच्यावर मृत्यूनंतरही अत्याचार करण्यात आला, असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत हथरस येथे जाणार असल्याची माहिती दिली आहे. “जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. “पीडित मुलीबरोबर आणि कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी केलेला व्यवहार मला तर मान्य नाहीच शिवाय कोणत्याही भारतीयांना हा व्यवहार पटला नसेल,” असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

 

News English Summary: Journalists were allowed to enter Hathras on Saturday after the Uttar Pradesh administration said the Special Investigation Team (SIT) probing the alleged gangrape of a 19-year-old Dalit woman by four upper caste men had completed its investigation. Chief Minister Yogi Adityanath also rushed senior officials, including additional Chief Secretary (Home) Awanish Kumar Awasthi and DGP Hitesh Chandra Awasthy, to meet the family of the victim.

News English Title: Rahul Gandhi Priyanka Gandhi to head to Hathras again on Saturday to meet gang rape victims family Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x