अटल टनेल | सोनिया गांधींनी २०१० मध्ये भूमिपूजन केलं | पण मोदींकडून खोटं चित्रं? - सविस्तर वृत्त

मनाली, ३ ऑक्टोबर : जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या महामार्ग बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. हिमाचल प्रदेशात हा जगातला सर्वात मोठा महामार्ग बोगदा आहे. ज्याचं नाव आहे अटल टनेल. माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांचे नाव या बोगद्याला दिले गेले आहे.
दरम्यान, रोहंताग पासजवळ एक ऐतिहासिक बोगदा बनवण्याची घोषणा स्वत: वाजपेयी यांनी ३ जून २००० साली केली होती. तो आता वाहतुकीसाठी तयार झाला. महत्त्वाचे म्हणजे भारत-चीनदरम्यान ताणलेले संबंध आणि युद्धजन्य स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला हा बोगदा वरदान ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, “अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते २००२ मध्ये भूमीपूजन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आलेल्या सरकारने या कामाकडे दुर्लक्ष केलं होतं. तज्ञ सांगतात ज्या वेगाने बोगद्याचं काम होत होतं, ते पाहता २०४० पर्यंतही काम पूर्ण झालं नसतं,” असा दावा नरेंद्र मोदींनी केला.
आता हा व्हिडिओ पहा….सोनिया गांधी यांनी तारीख २८ जून २०१० रोजी सदर प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं आणि तो २०१५ पर्यंत पूर्णत्वाला येणार होता. मग उशीर कोणी केला?
वास्तविक १९७२ मध्ये माजी आमदार लता ठाकूर यांनी सहा महिने बर्फात अडकून पडण्याच्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी बोगदा निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर सन २००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले मित्र टशी दावा ऊर्फ अर्जुन गोपाल यांच्या निमंत्रणावरुन केलांग येथे जाऊन रोहतांग बोगद्याच्या उभारणीची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर २८ जून २०१० मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी बोगद्यासाठी १,३५५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती आणि सदर प्रकल्प २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन होतं. जर नियोजन २०१५ होतं असं वरील व्हिडिओ पुरावा सांगतो, मग उदघाटन आज ३ ऑक्टोबर २०२० कसं होतंय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पण मोदींनी सगळं त्याउलट सांगून संभ्रम तर निर्माण केलाच, तसेच सदर प्रकल्प २०४० पर्यंत पूर्ण झालाच नसता असं सांगत मोदी सरकार आलं आणि तो पूर्ण झाला असा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न केला असंच म्हणावं लागेल.
२८ जुने २०१० मध्ये एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने देखील याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यामध्ये देखील सदर प्रकल्पाबद्दल सविस्तर भाष्य करण्यात आलं आहे.
News English Summary: Prime Minister Narendra Modi has inaugurated Atal Tunnel in Manali. It is “world’s longest highway” tunnel and is named Atal Tunnel, Rohtang. The 9.02 kilometres long engineering marvel connects Manali in Himachal Pradesh to Lahaul-Spiti throughout the year. Currently, the area remains cut off for about 6 months each year owing to heavy snowfall and inclement weather. The Atal tunnel has huge strategic significance as it will greatly assist in the movement of armed forces.
News English Title: Rohtang tunnel Sonia Gandhi lays foundation stone in 2010 Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON