22 November 2024 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

बिहार निवडणूक २०२० | राजद - काँग्रेस महाआघाडीतील जागा वाटपाचा पेच सुटला

Bihar Assembly Election 2020, RJD Party, Congress party, Bihar Election 2020

पटना, ३ ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचं जागावाटप निश्चित झालं आहे. आरजेडी 144, काँग्रेस 70 आणि लेफ्ट 29 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आरजेडी आपल्या कोट्यातून व्हीआयपी पक्षाला काही जागा देईल. आरजेडी, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (माले), सीपीएम आणि व्हीआयपी महाआघाडीतील पक्ष आहेत.

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते अविनाश पटदे यांनी म्हटले की, काही मतभेद दूर झाल्यानंतर आरजेडी, काँग्रेस, व्हीआयपी आणि लेफ्ट यांची महाआघाडी झाली आहे. 2015 मध्ये महाआघाडीला जनतेचं समर्थन मिळालं होतं. पण त्या बहुमताचं अपहरण झालं. नीतीश कुमार यांना दगा दिला आणि भाजपसोबत सत्तेत गेले. जनता त्यांना माफ करणार नाही. महाआघाडीचं नेतृत्व तेजस्वी यादव करतील.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणुकीअगोदरच यूपीएला मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पार्टी(रालोसपा)चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी यूपीएची साथ सोडत. बसपाला सोबत घेऊत तिसरी आघाडी निर्माण केली आहे.

दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

 

News English Summary: After days of negotiations and hard bargaining, the RJD-led opposition Grand Alliance in Bihar on Friday seemed to have more or less arrived at a seat-sharing arrangement, although the parties are yet to make an official announcement on the details, as they are said to be keeping an eye on the developments in the NDA. Sources in the Congress claimed the RJD has agreed to give it 68 to 70 seats. The Congress had contested 41 seats in 2015, winning 27.

News English Title: Bihar Assembly Election 2020 Congress Will Contest 70 Seats And Rjd 144 Seats Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x