22 November 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Bihar Assembly Election 2020 | लोक जनशक्ती पक्षाचा स्वबळाचा नारा

Lok Janshakti Party, NDA, Bihar Assembly Election 2020, JDS

पटना, ४ ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय घडमोडींना अधिकच वेग आला आहे. निवडणुकी अगोदरच ‘एनडीए’त फूट पडली आहे. पासवानांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, गरज पडल्यास भाजपाबरोबर काम करण्याची तयारी असल्याचेही सांगितले आहे. रविवारी दिल्लीत पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय लोक जनशक्ती पार्टीकडून घेण्यात आला आहे.

या बैठीकीतून बाहेर पडल्यानंतर लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी माध्यमांना व्हिक्टरीचे चिन्ह दाखवत, स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे दर्शवले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय बोर्डाची बैठक चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झाली. या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक न लढवण्याचा आणि लोजपा भाजपा सरकारचा प्रस्ताव पारित कण्यात आला. लोजपाचे सर्व आमदार मोदींचे हात बळकट करतील, असे ठरवण्यात आले.

याबाबत लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस अब्दुल खालिक यांनी बैठकीबाबत माहिती देताना सांगितले की, वैचारिक मतभेदांमुळे लोकजनशक्ती पार्टी जनता दल युनायटेडसोबत बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. मात्र राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि लोकजनशक्ती पार्टीची आघाडी मजबूत असेल.

 

News English Summary: The Lok Janshakti Party has taken a call to contest the upcoming three-phase assembly polls in Bihar on its own. The decision to break away from the National Democratic Alliance (NDA) was taken at the Parliamentary Board meeting of the party on Sunday. The party has earlier hinted at following the Manipur model in Bihar, where the party contested the 2017 assembly election alone and later its only MLA had joined the BJP government.

News English Title: Lok Janshakti Party Will Not Contest The Upcoming Biharelections With Janata Dal United Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x