25 November 2024 6:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

जुलै २०२१ पर्यंत २५ कोटी लोकांचं कोविड लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य - आरोग्यमंत्री

Covid 19 Vaccine, Doses, Dr Harshwardhan

नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर : कोरोनावरील लशीचे (Vaccine) जुलै २०२१ पर्यंत ५० कोटी डोस तयार करुन घेण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निश्चित केले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी देशातील खासगी कंपन्यांचे सहकार्य घेणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Harsh Vardhan) यांनी दिली. ते संडे संवादच्या चौथ्या भागात बोलत होते.

देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनावर मात करण्यासाठी लस देण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. ही योजना अंमलात आणण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. जुलै २०२१ पर्यंत किमान २० ते २५ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची योजना आहे.

लस निर्मिती आणि लसीकरण मोहिमेसाठी नियोजन सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच प्राधान्यक्रम निश्चित करेल. प्रत्येक राज्यातील कोणत्या पद्धतीचे काम करणाऱ्यांना प्राधान्याने लस द्यायची हे ठरवून नियोजन केले जाईल. देशातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन त्यांना कोरोनावर मात करण्यासाठी सक्षम केले जाईल, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. वैद्यकीय कर्मचारी या प्रकारात कोरोना संकटाशी लढणारे सरकारी आणि खासगी हॉस्पिटल तसेच दवाखान्यांचे डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आशा वर्कर्स, स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांचा समावेश होतो; अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

आणखी काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री ?
सरकार करोनावरच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी २४ तास काम करतं आहे, करोनाची लस आल्यानंतर वितरण प्रणालीचंही काम सुरु आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला करोना लस कशी दिली जाईल ही आमची प्राथमिकता आहे. करोना लशीच्या संदर्भात उच्चस्तरीय तज्ज्ञांची एक समिती कार्यरत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जगभरात करोनाचा कहर सुरुच आहे. अमेरिकेनंतर भारतात तो सगळ्यात जास्त आहे. सोबतच करोनावर लस शोधण्यासाठीही जगभरात प्रयत्न सुरु आहेत. भारतात सध्या करोनावरची लस शोधण्याचं काम तीन कंपन्या करत आहेत. यामध्ये भारत बायोटेक कोवॅक्सिन, जायडस कॅडिला जायकोव-डी आणि ऑक्सफर्डची करोना वॅक्सिन यांचा यात समावेश आहे. सीरम आणि ऑक्सफर्ड मिळून ही लस तयार करत आहेत. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. इतर दोन लशींच्या चाचण्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर आहेत.

 

News English Summary: Detailing the roadmap on vaccine procurement and distribution, Union Health Minister Dr Harsh Vardhan spelt out the government’s priority and what to expect in the coming months vis-a-vis vaccine development and inoculating the population. Interacting with social media users during the fourth edition of ‘Sunday Samvaad’, the minister said the government plans to receive and utilize 400-500 million Covid-19 vaccine doses and that of the 1.3 billion population, 20-25 crore people would be getting the first shot by July 2021.

News English Title: Covid 19 Vaccine Doses Covering Approximately 25 Crore People In India By July 2021 Says Dr Harshwardhan Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x