22 November 2024 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

MPSC Exam | मराठा समाज आक्रमक | मुख्यमंत्र्यांना पत्रातून शेवटचा अल्टिमेटम

MPSC Prelims 2020 Exam, Maratha Kranti Morcha, State government

मुंबई, ५ ऑक्टोबर : राज्यात कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली MPSC परीक्षा (MPSC Exam) पुन्हा लांबणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. कारण जर परीक्षा पुढे ढकलली नाहीतर राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. 11ऑक्टोबरला राज्यसेवेची पुर्वपरीक्षा होणार आहे. पण त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) समन्वयक धनंजय जाधवांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिती कडक आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टातून स्थगिती मिळाल्यामुळे परीक्षेची तयारी करणारे राज्यातले मराठी समाजाचे विद्यार्थी नाराज आहेत. परीक्षेसाठी अर्ज भरताना मराठा उमेदवारांनी एस.ई.बी.सी प्रवर्गातून अर्ज भरले होते. मात्र, आता आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे नेमक्या कुठल्या प्रवर्गात मराठी विद्यार्थी मोडणार याची अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, असं पत्रात लिहिण्यात आलं आहे. जर परीक्षा रद्द झाली नाही तर मराठा समाज राज्यात उग्र आंदोलन करणार असा स्पष्ट इशारा पत्रातून देण्यात आला आहे.

याआधी मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी आणि मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. अन्यथा येत्या 6 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करू, असा तीव्र इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिल्याने मराठा आंदोलन येत्या काळात आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

News English Summary: The Maratha Kranti Morcha has warned the state government to postpone the MPSC exams till the result of the reservation, otherwise it will disrupt the exams by hitting the examination centers directly. Representatives of Maratha Kranti Morcha have called TV news channels and conveyed the information to the government. Therefore, the tension of the state government and the Maharashtra Public Service Commission, including the candidates, has increased.

News English Title: MPSC Prelims 2020 Exam have to postpone said Maratha Kranti Morcha warn to state government Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x