22 November 2024 12:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला | BMC तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच

Congress, withdraws candidature, BMC standing committee election

मुंबई, ५ ऑक्टोबर : काँग्रेसने मुंबई महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला दिलेला शब्द पाळला. मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून स्थायीच्या निवडणुकीतही काँग्रेस माघार घेणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी झाल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे भाजपचे मनसुबे फोल ठरले.

राज्यातील महाविकास आघाडीत वितुष्ट नको म्हणून काँग्रेसने आज महापालिकेतील शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. स्थायी समितीतही हेच चित्र राहणार आहे. मतदानाच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहील, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष शिवसेनेला मतदान करणार आहेत. काँग्रेसने अर्ज मागे घेतला नसता तर भाजपने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान उभे केले असते.

मनपाचे २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे बजेट (budget) ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचे आहे. पालिकेचे सर्व आर्थिक निर्णय स्थायी समितीच्या मंजुरी नंतरच होतात. याच कारणामुळे मुंबई मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणत्या पक्षाला मिळणार याला प्रचंड महत्त्व होतं. पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेचा प्रयत्न स्थायीचे अध्यक्षपद जिंकण्याचा होता. मात्र शिवसेनेविरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांना पडद्यामागून नक्की कोणत्या पक्षाचे नगरसेवक पाठिंबा देणार यावर निकाल अवलंबून होता.

स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीत पराभव झाल्यास शिवसेनेच्या राजकीय प्रतिष्ठेला धक्का लागेल. ते होऊ नये म्हणून शिवसेनेचा प्रयत्न सुरू होता. निवडणुकीसाठी सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेकडे आहे. नगरसेवक फुटू नये म्हणून शिवसेनेने विशेष खबरदारी घेतली होती.

 

News English Summary: Congress kept its promise to Shiv Sena in the Mumbai Municipal Corporation elections. The Congress candidate has withdrawn his candidature in the Mumbai Municipal Corporation Education Committee elections and the Congress will also withdraw in the permanent elections. As the Shiv Sena and the Congress have a covert lead in the Municipal Corporation, the BJP’s intention to push the Shiv Sena’s dominance proved to be a fallacy.

News English Title: Congress withdraws candidature in BMC standing committee election Shivsena won Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x