24 November 2024 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

अनिल देशमुख महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर | भाजपाची प्रतिक्रिया

BJP MLA Atul Bhatkhalkar, Anil Deshmkh, Allegations, Sushant Singh Death Case

मुंबई, ६ ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने बिहार निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे, त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका करत तुम्ही गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी ८० हजार बनावट अकाऊंट उघडण्याचा प्रकार समोर आल्यावर त्यांनी भाजपाला अप्रत्यक्ष निशाणा बनवलं.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. याआधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा”.

“अनिल देशमुख यांनी नेहमीप्रमाणे भाजपावर खोटे राजकीय आरोप केले आहे. या खोट्या आरोपांबद्दल भाजपा तीव्र निषेध करते. जी चौकशी करायची आहे ती करा. भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस कधीच आणि कोणतंही बेकायदेशीर काम करत नाहीत,” असंही यावेळी अतुल भातखळकर यांनीही म्हटलं आहे. “राज्याने इतके राजकीय गृहमंत्री इतिहासात कधीच पाहिलेले नाहीत,” अशीही टीकाही त्यांनी केली आहे.

काय म्हणाले होते अनिल देशमुख?
बिहार निवडणुकीमुळे भाजपाने सुशांत प्रकरणावर राजकारण केले. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. एम्सच्या अहवालानुसार सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. यावरून हे सिद्ध होते की मुंबई पोलिसांनी केलेला तपास योग्य होता. सुशांत प्रकरणात आता सत्य समोर आले आहे. सुशांतच्या नावाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले. याशिवाय मुंबई पोलिसांचीही बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासणी अहवालाबद्दल खोटी अफवा पसरवली, यामागे कोण होता हे सर्वांनाच ठाऊक आहे. खोटे बोलण्यामागे भाजपाचा हात आहे. या विषयावर भाजपाने थोडे राजकारण केले. बिहार विधानसभा निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून हा मुद्दा फक्त भाजपानेच लावला होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना विचारायचे आहे की, ते महाराष्ट्रात मतभेद आणणार्‍या गुप्तेश्वर पांडे (बिहारचे माजी डीजीपी) यांच्यासाठी प्रचार करतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

News English Summary: BJP MLA Atul Bhatkhalkar tweeted that Home Minister Anil Deshmukh is a circus clown called Mahavikas Aghadi which is going on in the state. Earlier, he could not prove the allegations of phone tapping against the BJP government. Now in Sushant’s case, he has accused of bogus account. Don’t prove the allegations, but apologize to the people.

News English Title: BJP MLA Atul Bhatkhalkar On NCP Anil Deshmkh Allegations Over Sushant Singh Death Case Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x