22 November 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Matrimony | लग्न करण्याचे का टाळतात नव्या पिढीच्या मुली | काय आहेत कारणं

Indian Brides, Indian Wedding, Matrimony, Free Matrimony

मुंबई, ६ ऑक्टोबर : नव्या पिढीतील मुली चांगल्या मुलाच्या शोधात आणि करीयरच्या कारणाने लग्नापासून लांब पळतात. बरेचदा मनासारखा जोडीदार मुलींना सहज मिळत नसतो. आज जमाना बदलत असल्याने या बाबतीत सगळ्यांचे विचार बदलले आहेत. आता प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहली यांच्या नात्याबाबत बोलायचे झाल्यास आधी अनुष्का या बंधनात राहायला तयार नव्हती. अशातच विराटने अनकेदा प्रपोज करूनही तिने होकार दिला नव्हता. खरे तर प्रत्येक मुलीच्या मनात लग्न या विषयी काही त्रास असतात आणि त्यासाठी त्या लवकर या नात्यात पडायला तयार नसतात. चला पाहूया याबाबत मुलींचे विचार काय आहेत ते.

शिक्षण महत्वाचे:
नव्या पिढीतील मुली शिक्षणाला प्राधान्य देतात. त्यांच्या पालकांचाही त्याला आधार मिळाल्याने त्या त्यांच्या भविष्याबाबत सजग झाल्या आहेत. म्हणून त्या शिक्षणाकडे लक्ष देणे आणि त्यांची स्वप्ने साकार करणे महत्वाचे मानतात. त्या इंडिपेंडेंट होण्यावर जास्त भर देतात. आर्थिक रुपात स्वतंत्र होणे ही त्यांची प्रथम प्रायॉरिटी बनली आहे.

लग्नानंतर वाढणाऱ्या जवाबदाऱ्या:
आजही लग्नानंतर घर सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी सुनेवरच टाकली जाते. मान्य कि एक स्त्री ही घर सांभाळायला पूर्णपणे सक्षम असते पण सगळेच तिच्यावर ढकलून देणे हे योग्य नाही. अशात घर, मुले, माहेर, करियर, नातेवाईक यांच्याशी निगडीत सगळ्या जबाबदार्या निभावताना त्या मुलीच्या डोक्यावर त्या ओझे बनून जातात. म्हणूनच अनेकदा मुली लग्न करण्यापासून दूर पळत राहातात.

आईवडिलांचे बदलते विचार:
आता पूर्वीचा काळ राहिला नाही. आई वडील मुलीवर लग्नासाठी प्रेशर न देता तिचा निर्णय तिला घेऊ देतात. तिच्या लग्नासाठी घाई करण्यापेक्षा ते तिला तिच्या पायावर उभे करण्याबाबत जास्त विचार करतात. म्हणूनच मुली त्यांचे भविष्य नीट पद्धतीने घडविण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित करू शकतात.

करियरशी तडजोड करण्याची भीती:
अनेकदा लग्नानंतर घर, सासू सासरे आणि मुले यांच्या जबाबदारीमुळे मुलींना करियरशी तडजोड करावी लागते. बरेचदा अति जबाबदार्यांमुळे मुली त्यांच्या करियर आणि कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. बरेचदा यामुळे त्यांची करियरमधली ग्रोथ थांबते. अनेकदा लग्नानंतर सुनेला नोकरी सोडण्यास सांगितले जाते आणि हेच कारण आहे ज्यासाठी मुली लग्नाचा विषय टाळतात.

योग्य जोडीदाराचा शोध:
मुलांच्या तुलनेत लग्नानंतर मुलींच्या जीवनात खूप बदल होतात. मुलींना अशा जोडीदाराचा शोध असतो जो सगळ्या प्रकारे तिची साथ देईल. बरेचदा अनेक मुलगे सपोर्टिंग नसतात ज्यामुळे मग मुलींच्या करियरमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा मुलांना वाटते कि सगळ्या जबाबदार्या मुलीच्याच असतात. अशा मुलांना लहानपणी काम शिकवले नसेल तर आणखी अडचण निर्माण होते. आजच्या काळात मुलींना असा जोडीदार हवा असतो जी इंडिपेंडेंट विचारांचा असून प्रत्येक कामात बायकोची साथ देईल.

 

Article English Summary: The new generation of girls run away from marriage in search of a good boy and for career reasons. It is not easy for a girl to find a suitable partner. As times change, so do the views of others. Now, when it comes to the relationship between famous actress Anushka Sharma and cricketer Virat Kohli, Anushka was not ready to be in this bond before. Even though Virat proposed to her many times, she did not agree. In fact, every girl has a problem in her mind about marriage and for that she is not ready to fall into this relationship soon. Let’s see what the girls think about it.

Article English Title: Why Indian females do not want to get early marriage wedding article.

हॅशटॅग्स

#Matrimony(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x