29 April 2025 9:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 30 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
x

संघप्रणित मजदूर संघाचा कामगारविरोधी तरतुदींना विरोध | भाजपाची डोकेदुखी वाढणार

Bharatiya Mazdoor Sangh, RSS, Protest against anti worker provisions, New labour codes

नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने (बीएमएस) कामगार संहितांमधील कामगारविरोधी तरतुदींना तीव्र विरोध केला आहे. या तरतुदी मागे न घेतल्यास २८ ऑक्टोबरला देशभरात निदर्शने करण्याचा इशारा संघाने दिला आहे.

आपल्या मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्यास संप तसेच अन्य पद्धतीने दीर्घकाळ आंदोलन करण्याची बीएमएसची योजना आहे. बीएमएसच्या गेल्या आठवड्यात व्हर्चुअल माध्यमातून झालेल्या राष्ट्रीय परिषदेत यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला होता. याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

संसदेने पावसाळी अधिवेशनात औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षासंहिता २०२० आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी वातावरण विधेयक ही तीन कामगार संहिता विधेयके मंजूर केली. चौथे, वेतन संहिता विधेयक हे संसदेने ऑगस्ट २०१९मध्ये मंजूर केले आहे. मात्र त्याला अंतिम रूप देण्याची आणि अंमलबजावणीची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. या चारही कामगार संहिता डिसेंबरपर्यंत एकाच टप्प्यात लागू करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.

 

News English Summary: The Bharatiya Mazdoor Sangh (BMS) will organise all-India agitation against what it alleges are “anti-worker provisions” in the new Labour Codes. At its 19th National conference, the BMS, an affiliate of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), passed six resolutions seeking the withdrawal of anti-worker provisions in the new Labour Codes; a consultation meeting with BMS and other trade unions to make the Labour Codes beneficial to both worker and industry and formulation of a national employment policy.

News English Title: Bharatiya Mazdoor Sangh to protest against anti worker provisions in new labour codes Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या