22 November 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

फिल्मी राणी लक्ष्मीबाईची पद्मश्री पुरस्कार परत करण्याच्या विधानावरून पलटी

Kangana Ranaut, Returning Award, Sushant Singh Rajput Case

मुंबई, ८ ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली असं सांगणारा रिपोर्ट एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे सोपवला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर #KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग नंबर एकला ट्रेण्ड होताना दिसत आहे. ”सुशांतने आत्महत्या केल्याचे आरोप सिद्ध करु शकले नाही, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन”, असं वक्तव्य कंगना रणौत जुलै महिन्यामध्ये केलं होतं. मात्र, एम्स रुग्णालयाकडून आलेल्या रिपोर्टनंतर सोशल मीडियावर सेलिब्रिटींसह अनेकांनी तिच्याकडे पद्मश्री पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. परंतु, या सगळ्यावर कंगनाने मौन सोडलं असून तिचं मत व्यक्त केलं आहे.

“स्मरणशक्ती कमी असेल तर ही मुलाखत परत पाहा. जर मी कोणतेही चुकीचे किंवा खोटे आरोप लावले असतील तर माझे सगळे पुरस्कार परत करे

न. हे एका क्षत्रिय व्यक्तीचं वचन आहे. मी श्रीरामाची भक्त आहे. प्राण जाए पर वचन न जाए. जय श्री राम”, असं ट्विट कंगनाने केलं आहे. सोबतच तिने त्याच्या मुलाखतीची लिंकदेखील शेअर केली आहे.

दरम्यान सुशांतसिंह राजपूत प्रकरणी एम्सने सीबीआयकडे अहवाल सादर केला आहे. सीबीआयनेही एम्सच्या अहवालाचे विश्लेषण सुरू केलं आहे. सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? यावरून सीबीआय निष्कर्ष काढणार आहे. आता एम्सच्या अहवालावर सीबीआय अंतिम निर्णय घेईल. सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? पुराव्यांच्या आधारावर सीबीआय निर्णयावर घेईल. ऑटोप्सी आणि व्हिसेराचा तपास अहवाल सीबीआयला सोपवण्यात आला आहे. सीबीआय या अहवालाची अन्य पुराव्यांशी तुलना करेल. अहवालाच्या आधारे सीबीआय आपला पुढील तपास करेल.

 

News English Summary: Actor Kangana Ranaut is standing by her earlier statement, saying that she will return her awards if her accusations are found wrong in the Sushant Singh Rajput case. After Swara Bhasker tweeted a veiled comment at Kangana on Wednesday afternoon, the latter also shared a tweet in reply. “This is my interview, if your memory is weak then watch it again. If I have made a single false accusation, then I will return all my awards, this is the promise of a Kshatriya, I am a devotee of Lord Ram. I will give my life for a promise. Jai Shri Ram,” she tweeted and added the #KanganaAwardWapasKar hashtag that has been trending since Swara’s tweet.

News English Title: Kangana Ranaut Tweet On Returning Award Says I Will Return It If I Said Anything Wrong Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x