23 November 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

सराफाकडून शोभा देशपांडेंचा मराठीवरून अपमान | मनसेने सोन्यासारखं धूत पिवळा केल्यावर माफी

Writer Shobha Deshpande, MNS Sandeep Deshpande, Mumbai Saraf

मुंबई, ९ ऑक्टोबर : मनसेने चोप दिल्यानंतर आणि माफी मागत नाही तोवर दुकान उघडू देणार नाही असा इशारा दिल्यानंतर या मुंबईतल्या कुलाबा येथील महावीर ज्वेलर्स चालवणाऱ्या सराफाने लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली आहे. माझ्याशी मराठीत बोला असा आग्रह धरल्याने लेखिका शोभा देशपांडे यांना या सराफाने हीन वागणूक दिली तसंच दोन महिला पोलिसांच्या मदतीने दुकानाबाहेर ढकलून दिलं अशा आरोप लेखिका शोभा देशपांडे यांनी केला.

एवढंच नाही तर त्या काल दुपारी २ वाजल्यापासून या दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन करत होत्या. या प्रकरणात आज मनसेने खळ्ळं खट्याक केल्यानंतर मुजोर सराफाने अखेर लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागितली. सुमारे २१ तासांपेक्षा जास्त काळानंतर मराठी लेखिका शोभा देशपांडे यांचं मुंबईतलं ठिय्या आंदोलन संपलं आहे. त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असल्याने रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

दुकानदार येऊन जोवर दुकानाचं लायसन्स (परवाना) दाखवत नाही तोवर आपण आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. दरम्यान आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे या ठिकाणी आले आणि त्यांनी लेखिका शोभा देशपांडे यांची भेट घेतली. त्यानंतर दुकानदाराला मनसे स्टाइल दणका दाखवल्यानंतर या मुजोर सराफाने शोभा देशपांडे यांचे पाय धरले आहेत.

महाराष्ट्रात विशेषत: मुंबईतच अनेकदा माय मराठीचा अवमान झाल्याच्या घटना उघडकीस येतात. काही अमराठी भाषिकांकडून मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देत मराठी माणसांना, मराठीजनांना डिवचण्याचं काम होतंय. आज पुन्हा एकदा अशीच घटना मुंबईतील कुलाबा परिसरात उघडकीस आली होती. येथील महावीर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानदाराने शोभा देशपांडे यांना मराठी बोलण्यास नकार देऊन महिलेस अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई करून पोलिसांना बोलावून अपमानित केले. त्यानंतर, गुरुवारी सायंकाळ ५ वाजल्यापासून त्यांनी दुकानासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले होते.

 

News English Summary: Sarafa, who runs Mahavir Jewelers in Colaba, Mumbai, has apologized to author Shobha Deshpande after the MNS beat him up and warned him not to open the shop unless he apologized. Writer Shobha Deshpande alleged that the bully treated the writer Shobha Deshpande with contempt and pushed her out of the shop with the help of two policemen.

News English Title: MNS leader Slaps Sarafa For Not Speaking Marathi In Mumbai After That He Apologizes To Writer Shobha Deshpande Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x