24 November 2024 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

MPSC परीक्षा घेण्याचं घातकी धाडस राज्य सरकारने करु नये | उदयनराजेंचा इशारा

MPSC Prelim Exam 2020, BJP MP Udayanraje Bhonsale, Warn MahaVikas Aghadi government

सातारा, ९ ऑक्टोबर : राज्यात मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत MPSC ची परीक्षा घेण्याचं घातकी धाडस राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करु नये असा इशारा भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. त्या संदर्भात एक फेसबूक पोस्ट लिहून राजेंनी हा इशारा दिला आहे.

सरकारने ११ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचा घाट घातला आहे. तो अन्यायकारक निर्णय आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णयही आलेला आहे. अशात ठाकरे सरकारला एमपीएससीची परीक्षा घेण्याची एवढी घाई का आहे? असाही प्रश्न उदयनराजेंनी विचारला आहे.

मराठा समाज हा जितका संयमी आहे तितकाच आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून MPSC च्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये असाही इशारा उदयनराजेंनी दिला आहे.

नेमकी काय पोस्ट लिहिली उदयनराजे भोसले यांनी…

सरकारने आता मराठा समाजाची परिक्षा पाहू नये…

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तरीही सरकारने ११ ऑक्‍टोबरलाच परिक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. एकीकडे राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससी परिक्षा घेण्याची एवढी घाई का आहे? जर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. मराठा समाज हा जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये.

येत्या ११ तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही सरकारने ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर लगेच १५,००० जागा भरण्याची सरकारला एवढी घाई का झाली आहे.? आरक्षणाच्या स्तगितीमुळे मराठा समाजात प्रचंड मोठी चिड निर्माण झालेली आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे.

जोपर्यंत मराठा आरक्षणाचा योग्य न्याय देणारा निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारने परीक्षा घेण्याचा घातकी निर्णय घेण्याचे धाडस करू नये. जेणेकरून सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्णयानंतर त्या परीक्षा नव्याने घेता येतील. तसेच विद्यार्थ्यांची अशा परिक्षेसाठीची वयोमर्यादा वाढवून सर्वानाच संधी मिळेल अशी व्यवस्था करावी. वयोमर्यादा वाढल्यामुळे कोणाचीही संधी हुकणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे शासनाने आज तरी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घोषित करावा.

याशिवाय कोरोना महामारीच्या परिस्थितीत कोचिंग क्लासेस, ग्रंथालय आणि अभ्यासिका बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य झाले नाही. तसेच परीक्षेसाठी पोषक असे वातावरण नसताना सरकार या परिक्षा कशासाठी घेत आहे.? परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्याना कोरोनाचा संसर्ग झाल्यास कोण जबाबदार राहणार? त्यामुळे सरकारने या परिक्षा तात्काळ पुढे ढकलाव्यात, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहील.

 

News English Summary: BJP’s Rajya Sabha MP Udayan Raje Bhonsale has warned the MahaVikas Aghadi government not to take the risk of taking the MPSC exam (MPSC Prelim Exam 2020) until a decision is taken on Maratha reservation in the state. Many student organizations, including the Maratha Kranti Morcha, have demanded that the Maharashtra Public Service Commission examination be postponed. Raje has given this warning by writing a Facebook post in that regard.

News English Title: MPSC Prelim Exam 2020 BJP MP Udayanraje Bhonsale warn MahaVikas Aghadi government Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x