22 November 2024 5:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शिवसेनेचे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय विंग मराठी बोलतात का? - रामदास आठवले

Union Minister Ramdas Athawale, Shivsena, Marathi Language issue

मुंबई, ९ ऑक्टोबर : मराठी बोलण्यासर नका देत 75 वर्षीय महिलेला दुकानाबाहेर काढणाऱ्या सराफ दुकानदाराने अखेर माफी मागून आंदोलन मागे घेण्याची विनंती शोभा देशपांडे यांना केली. मराठीचा आग्रह धरत आंदोलन केलेल्या शोभा देशपांडे यांचे वृत्त मीडिया आणि सोशल मीडियात झळकताच, मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच, या महिलेशी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनवरुन संवाद साधला आहे. मात्र, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी या महिलेच्या व शिवसेनेच्या भूमिकेला आपला विरोध दर्शवला आहे.

शिवसेनेत उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय विंग आहेत. ते सगळे मराठी बोलतात का?, असा सवाल आठवलेंनी उपस्थित केला. तसेच, मराठी बोलणं सक्तीचं करता येणार नाही, शोभा देशपांडे आणि शिवसेनेच्या भूमिकेला माझा विरोध, आहे असं म्हणत शिवसेना मराठी भाषेचं राजकारण करतेय, असेही आठवलेंनी म्हटले.

महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे. लेखिका शोभा देशपांडे यांच्या मतांशी मी सहमत नाही, असे रामदास आठवलेंनी म्हंटले आहे. मराठा आरक्षणाविषयी बोलताना एक राजा तर बिनडोक असल्याची टीका वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी नामोल्लेख न करता खा. उदयनराजे यांच्यावर केली होती. यावर बोलताना रामदास आठवले यांनी छत्रपतींना बिनडोक म्हणणे योग्य नसल्याचे म्हंटले आहे.

 

News English Summary: Shiv Sena has North Indian and South Indian wings. Do they all speak Marathi ?, Athawale asked. Also, speaking Marathi cannot be made compulsory, saying that I am against the role of Shobha Deshpande and Shiv Sena, Shiv Sena is doing politics of Marathi language, Athawale said.

News English Title: Union Minister Ramdas Athawale criticized Shivsena over Marathi Language issue Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x