22 November 2024 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आपण कुठल्या कडेवर आहात हे मी विचारणार नाही | आ. रोहित पवारांचं प्रतिउत्तर

NCP MLA Rohit Pawar, BJP MLA Gopichand Padalkar, Karjat Jamkhed Road

मुंबई, १० ऑक्टोबर : ‘पंतप्रधान नरेंद मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावरून टीकाकारणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उंची वाढल्यासारखे वाटते. परंतु, शरद पवार यांच्या खांद्यावर बसून ते स्वतःची उंची मोजतात. तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून उतरा म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही किती खुजे आहे हे कळेल’ अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.

गोपीचंद पडळकर हे करमाळा येथून औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी जात होते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील अहमदनगर करमाळा महामार्गावरील पडलेल्या खाड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्या पडळकर यांनी मिरजगाव येथे आल्यानंतर तेथील लोकांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी खराब रस्त्यावर उभा राहून व्हिडीओ बनवला आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

त्यानंतर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून याला प्रत्युत्तर दिलं आहे. “पवारसाहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे. मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात हे मी विचारणार नाही” असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं आहे.

रोहित पवार यांनी काय उत्तर दिलंय?
माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते. असो.

पंचवीस वर्षांपैकी पाच वर्षे याच मतदारसंघातील आमदार हे राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते, तरीही रस्त्यांची ही दुरवस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. पण आपण मोठे नेते आहात त्यामुळं त्यांना जाब विचारणार नाहीत.

आणखी एक मुद्दा म्हणजे कर्जत-जामखेड याच मतदारसंघाची निवड का केली, असा प्रश्न मला मिडियासह अनेकांनी विचारला आणि त्याचं उत्तर मी यापूर्वीही अनेक जाहीर कार्यक्रमांतही दिलंय… ते म्हणजे या मतदारसंघाची अशी दुरवस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे. हे मी आधीच सांगितलंय, त्यामुळं आपण मिरजगावमधील खराब रस्ता आज दाखवला, यात नवीन काहीच नाही आणि अशा खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आणि मी ती पूर्ण करणारच. मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही तर जमिनीवर उतरून काम करणारा, लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका.

राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा…. तर साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा.

माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण…

Rohit Rajendra Pawar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 10, 2020

 

News English Summary: NCP MLA Rohit Pawar has responded to BJP MLA Gopichand Padalkar by writing a Facebook post. Pawar is our leader, guide and Sarvesarva and I am proud of him. MLA Rohit Pawar has replied that I will not ask which side you are on instead of paying attention to whose shoulder I am sitting on.

News English Title: NCP MLA Rohit Pawar Answer To BJP MLA Gopichand Padalkar Via Facebook Post Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x