22 November 2024 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शिवसेनेला बिहारमध्ये बिस्किट निवडणूक चिन्ह | शिवसेनेची तीव्र नापसंती

Bihar Assembly Election 2020, Shivsena, Biscuit symbol, Election Commission

पाटणा, ११ ऑक्टोबर : बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जदयूने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतल्याने शिवसेनेने उपलब्ध असेल ते निवडणूक चिन्ह घेऊन जदयू आणि भाजप यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शिवसेनेने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय सुचविलेला असताना, त्याच्यापैकी कोणताही पर्याय न देता ‘बिस्किट’ हे वेगळेच निवडणूक चिन्ह दिल्याने शिवसेनेने नापसंती दर्शवली आहे.

बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष सत्तेत असून ‘बाण’ हे जदयूचे निवडणूक चिन्ह आहे. शिवसेनेचेही नेमके ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह असल्याने ऐन निवडणुकीत बाण की धनुष्यबाण असा मतदारांचा गोंधळ होतो आणि आमच्या हक्काची मते शिवसेनेला जातात, असा दावा मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी निवडणुक आयोगापुढे केला होता. शिवसेनेला धनुष्यबाण ही निशाणी देऊ नये, अशी मागणीही जदयूने निवडणूक आयोगाकडे केली होती.

त्यावर आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाणावर निवडणूक लढविता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उपलब्ध निवडणूक चिन्हापैकी एक चिन्ह घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली. बिहारमध्ये किमान ५० जागा लढविण्याचा शिवसेनेचा विचार आहे.

 

News English Summary: The JD (U), the ruling party in Bihar, has objected to the Shiv Sena’s ‘bow and arrow’ election symbol. While the Shiv Sena has suggested an alternative of three symbols to the Election Commission for this, the Shiv Sena has expressed its displeasure as it has given a different election symbol of ‘Biscuit’ without giving any of them.

News English Title: Bihar Assembly Election 2020 Shivsena may contest with Biscuit symbol Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x