22 November 2024 6:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

देशात विद्वेष पसरविणाऱ्या तीन वाहिन्यांना जाहिराती देणार नाही | उद्योगपती राजीव बजाज

Rajiv Bajaj, Blacklisted three channels, No Advertising, Fake TRP

मुंबई, ११ ऑक्टोबर : समाजामध्ये विद्वेष पसरविणाºया व विषारी वातावरण निर्माण करणाºया तीन वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचे बजाज ऑटो कंपनीने ठरविले असून, त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. ही माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी दिली आहे. मात्र, त्यांनी या तीन वाहिन्यांची नावे उघड केलेली नाहीत.

टीआरपी वाढविण्याचे रॅकेट मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले असून, याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली होती. त्यानंतर राजीव बजाज यांनी ही घोषणा केली. राजीव बजाज यांनी सांगितले की, तुमचा ब्रँड उत्तम व विश्वासार्ह असेल तर त्याच्या बळावर व्यवसाय आणखी मोठ्या प्रमाणावर वाढविता येतो. भक्कम पायावर उभ्या असलेल्या व्यवसायातून समाजहिताच्या काही गोष्टीही करता येतात. समाजात विद्वेष पसरविणाऱ्या लोकांशी बजाज ऑटो कोणताही संबंध ठेवू इच्छित नाही.

त्यामुळेच तीन दूरचित्रवाहिन्यांना आम्ही जाहिराती न देण्याचे ठरविले आहे. ते म्हणाले की, कोणती दूरचित्रवाहिनी किंवा वृत्तपत्र समाजात विषाक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करते हे आम्हाला लगेच ओळखता येते. अशांना जाहिराती न दिल्याने व्यवसायावर जो परिणाम होईल तो होऊ द्या.

राजीव बजाज यांच्या भूमिकेचे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले की, स्पष्टवक्ते वडील राहुल बजाज यांचा वारसा राजीव चालवीत आहेत. विद्वेष पसरविणाऱ्या दूरचित्रवाहिन्यांना जाहिराती देणार नाही हे सांगायला जिगर लागते व ते राजीव बजाज यांच्याकडे आहे.

 

News English Summary: Industrialist Rajiv Bajaj on Thursday said Bajaj Auto has blacklisted three channels for advertising as the company does not endorse toxicity and hate-mongering in the society. This comes after Mumbai city police chief Param Bir Singh claimed to have busted a racket to manipulate TRPs and arrested two persons. TRP (television rating point) is a tool to judge which TV programs and channels are viewed the most. Bajaj said a strong brand is a foundation on which you build a strong business.

News English Title: Rajiv Bajaj says blacklisted three channels for advertising Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x