22 November 2024 9:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

प्रॉपर्टी कार्ड | पंतप्रधान मोदींनी केली महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेची सुरुवात

SVAMITVA scheme, PM Narendra Modi, launch Property cards

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेची सुरूवात केली. या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केल्यानंतर सुमारे १ लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड वितरीत केले जातील. हे कार्ड मोबाइल फोन आणि एसएमएसद्वारे पाठवण्यात आलेल्या लिंकने डाउनलोड केले जाऊ शकेल.

या योजनेत दिल्या जाणाऱ्या संपत्तीच्या मालकीच्या कार्डमुळे बँकेतून कर्ज घेणं किंवा इतर कामांसाठी त्या कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो. आज सकाळी ११ च्या सुमारास या योजनेची सुरूवाच होणार आहे. हा दिवस ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ऐतिहासिक राहणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेमुळे ६ राज्यांमधील ७६३ पंचायतींच्या एक लाख लोकांना लाभ मिळणार आहे. यात उत्तर प्रदेशातील ३४६, हरयाणातील २२१, महाराष्ट्रातील १००, मध्य प्रदेशातील ४४, उत्तराखंडातील ५० आणि कर्नाटकातील २ पंचायतींचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केल्यानंतर ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असा लोकांची वार्तालाप केला. या दरम्यान आता आपल्या संपत्तीवर कोणीही वाकडी नजर ठेवू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi on Sunday (October 11) will launch physical distribution of property cards under the ‘SVAMITVA’ (ownership) scheme through video conferencing as part of major reform efforts for change in rural India. Under this scheme, about one lakh property owners will be able to download property cards from the link received through SMS on their mobile phones. The respective state governments will distribute physical cards. Under this scheme, people from 763 villages of Uttar Pradesh, Haryana, Maharashtra, Madhya Pradesh, Uttarakhand and Karnataka will be the beneficiary of the ‘SVAMITVA’scheme.

News English Title: SVAMITVA scheme PM Modi to launch physical distribution of property cards on Oct 11 Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x