Health First | कोरोनासाठी प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक उपाय
मुंबई, ११ ऑक्टोबर : सध्या सारे जग हे कोविड-१९ म्हणजेच कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या महामारीमुळे पीडित आहे. अशामध्येच आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आपणास स्वस्थ व निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे कार्य करते. या रोगामध्ये प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. सध्या कोविड-१९ या रोगावर कुठलाही खात्रिशीर उपाय सापडलेला नाही. त्यामुळेच या रोगापासून वाचण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे उपाय करणे योग्य ठरेल.
आयुर्वेद हे आयुष्य व आरोग्याचे विज्ञान असल्याकारणाने ते नैसर्गिक साधनांच्या वापरावर अधिक भर देते. आयुर्वेद हे मुख्यत्वे औषधी गुणधर्म असलेल्या रोपांवर आधारित विज्ञान आहे. आयुर्वेदात दिलेल्या सरळ आणि सोप्या पद्धतीद्वारे आपण आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता अजून मजबूत बनवू शकतो. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने यासंदर्भातच श्वसन संस्थेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी वैयक्तिक स्तरावर काळजी घेण्याकरिता काही उपाय सांगितले आहेत. सदरील उपाय हे आयुर्वेदातील साहित्य व संशोधनावर आधारित आहेत.
शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली वाढविण्यासाठी सामान्य उपाय:
- दिवसभर फक्त गरम पाणी प्या.
- दररोज किमान अर्धा तास योगासन, प्राणायाम आणि ध्यान करावे.
- दररोजच्या जेवणात हळद, जिरे, धने आणि लसुनाचा वापर करावा.
रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी उपाय:
- रोज सकाळी १० ग्रॅम च्यवनप्राश (१ चमचा) घ्यावा.
- तुळशीची पाने, दालचिनी, काळे मिरे, सुंठ, तसेच मनुकांपासून बनविलेल्या हर्बल टीचा किंवा काढ्याचे दिवसातून किमान दोन वेळा सेवन करावे. चवीनुसार यामध्ये गुळ किंवा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.
- अर्धा चमचा (छोट्या चमचाने) हळद १५० मिली गरम दुधात टाकून दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावे.
खोकला किंवा घसा खवखवणे:
- दिवसातून कमीत कमी एक वेळा पुदिन्याचे पाने किंवा ओवा टाकून पाण्याची वाफ घ्यावी.
- खोकला किंवा घशात खवखवत असल्यास लवंगाच्या चुर्णामध्ये गुळ किंवा मध मिसळवून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
- वरील लक्षणे कमी नाही झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
#महत्वाची_नोट: सदरील माहिती ही भारताच्या आयुष मंत्रालयाकडून नागरिकांच्या हितार्थ प्रसिद्ध करण्यात आलेली असून ते फक्त प्रतिबंधात्मक असून उपचार नाहीत
News English Summary: With the world gripped by the contagion of the novel coronavirus strain from China that has so far claimed at least 130 lives and infected 6,000 people across the world, India’s Ministry of traditional medicine or AYUSH (Ayurveda, Unani, Siddha, Homeopathy) on Wednesday issued an “advisory” advocating preventive treatment against the viral infection. The note was widely circulated via the official Press Information Bureau. The same advisory also lists a host of preventive steps according to the tenets of Homoeopathy and prescribes “Arsenicum album30” that could be taken as “prophylactic medicine against Coronavirus infections.” The Homoeopathy recommendation came after the AYUSH Ministry had a meeting on Tuesday with the Central Council for Research in Homoeopathy to discuss how Homoeopathy could be used to treat a coronavirus infection.
News English Title: Preventive Ayurvedic remedies for corona health article.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार