25 November 2024 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Fake TRP | प्रक्षोभक वृत्त आणि खोटी माहिती देणाऱ्यांना जाहिराती नाही - Parle G

Fake TRP, Parle G company, black listed news channels, Advertisement

मुंबई, १२ ऑक्टोबर : विखारी प्रचार करणाऱ्या, आक्रमकपणे खोटी माहिती देणाऱ्या, समाजात तेढ निर्माण होईल असा कंटेट देणाऱ्या चॅनेल्सवर जाहिरात देणार नाही, असा मोठा निर्णय मुंबईची प्रसिद्ध बिस्किट कंपनी पारले जी ने घेतला आहे. यामुळे आता सोशल मीडियावर Parle G ची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. Twitter करांनी तर पारले जी ला Genious किताब देऊन टाकला आहे.

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी TRP स्कॅम उघडकीस आणणारी पत्रकार परिषद घेतली. काही चॅनल्सनी पैसे देऊन TRP विकत घेतल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. त्या चॅनेल्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीआरपीचा घोटाळा समोर आल्यानंतर आता त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या पारले-जी कंपनीने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. प्रक्षोभक आणि चिथावणीखोर कंटेंट दाखवणाऱ्या वृत्तवाहिन्यांवरून भविष्यात पारले जी बिस्किटांची जाहिरात केली जाणार नसल्याचं कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी घोषित केलं आहे. काही दिवसांपूर्वी तीन चॅनेल्सचं नाव TRP स्कॅममध्ये आलं होतं. त्यानंतर अनेकांनी या वृत्त वाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय घेतला होता.

मिन्टने ने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयाविषयी माहिती देताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी सांगितलं की, सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा कंटेंट प्रसारित करणाऱ्या टीव्ही न्यूज चॅनेल्सवरून कंपनीकडून जाहिरात करण्यात येणार नाही. त्यामुळे वृत्त वाहिन्यांना आणि इतर मनोरंजनपर वाहिन्यांना आपला कंटेंट बदलण्याची गरज असल्याचा संदेश देखील जाईल. सामाजिक स्वास्थ आणि सलोखा बिघडवणाऱ्या या वाहिन्यांवर पैसा खर्च करण्याची कंपनीची थोडीही इच्छा नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Key advertisers and media agencies say they are closely tracking and re-evaluating media spends on television news channels accused of tampering with television rating points (TRPs), rumour-mongering and spreading hate. The move comes after the Mumbai Police on Thursday said its probe into a complaint by TV viewership measurement agency Broadcast Audience Research Council (BARC) had unearthed a racket of TRP-fixing by some channels, including news broadcaster Republic TV. The alleged scam has made advertisers worried about advertising on news channels that have been under the scanner. Although Parle Products, the maker of Parle G biscuits, has not been active on TV due to covid, its senior category head Krishnarao Buddha said the company will not advertise on news channels that broadcast toxic content.

News English Title: Fake TRP Parle G company will not advertise on news channels that broadcast toxic content Marathi News News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x