22 November 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत

NCP MLA Rohit Pawar, Amit Thackeray, Appreciating, Mahavikas Aghadi decision

मुंबई, १३ ऑक्टोबर : आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, असे रोहित यांनी म्हटले आहे.

तसेच, रोहित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाह टोला लगावला आहे. केवळ प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी रोहित पवार हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करत असल्याचे वक्तव्य मध्यंतरी चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर रोहित पवार यांनी, आमच्या वास्तव भूमिकेवरही मोठं होण्यासाठी बोलत असल्याची टिका करणारे आणि सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते विरोधी पक्षात भरपूर आहेत, पण सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, असे ट्विट केले आहे.

अमित ठाकरेंनी काय केले होते ट्विट?
या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आपली भूमिका स्पष्ट केली होती. मुंबईच्या आणि भावी पिढीसाठी गरजेच्या असलेल्या पर्यावरणाचे नुकसान होण्यापेक्षा कारशेडचे नुकसान झालेले परवडेल, असे अमित ठाकरे यांनी म्हटले होते.

 

News English Summary: MNS leader Amit Thackeray had expressed support for the state government’s decision to shift the metro car shed in Aarey to Kanjurmarg. His role has been lauded by NCP MLA Rohit Pawar. “I am happy to see that leaders like you, who are heartily supportive of the good work of the government, are in the Opposition,” he said.

News English Title: NCP MLA Rohit Pawar thanks to Amit Thackeray over appreciating Mahavikas Aghadi decision Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x