22 November 2024 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS
x

मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा! धुंद तुझे सरकार | भाजपकडून राज्यभर आंदोलन

BJP Protest. Mahavikas Aghadi, Reopen of temples

पुणे, १३ ऑक्टोबर : राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज (१३ ऑक्टोबर) भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन सुरु आहे. याठिकाणी धर्मगुरू आणि आचार्यांकडून लाक्षणिक उपोषण केले जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली. ‘मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार’, असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने मंदिरे सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, राज्यात अद्याप मंदिरे बंद असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. १७ मार्चपासून राज्यात मंदिर बंद असल्याने शिर्डीतील अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. रोज करोडो रुपयांची उलाढाल शिर्डीत होत असते. तर देश विदेशातून भाविक साईंच्या दर्शनाला येत असतात. शिर्डीत मोठ्या प्रमाणात हॉटेल, हारफुलें, प्रसाद, मूर्त्यांची विक्रीचा व्यवसाय केला जातो. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय हे मंदिरावर अवलंबून आहेत. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मंदिर उघडण्याच्या मागणीने शिर्डीत जोर धरला आहे.

 

News English Summary: BJP leader Prasad Lad and other party workers were detained in Mumbai on Tuesday as they staged protests outside Siddhivinayak and Shirdi Sai Baba temples to demand the opening of all the temples in the state amid COVID-19. During the protest, the party workers tried to enter the temple amidst heavy police deployment and barricading as they demanded the reopening of all temples in Maharashtra for devotees.

News English Title: BJP Protest against Mahavikas Aghadi on reopen of temples News Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x