25 November 2024 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

मुबईला PoK म्हणणाऱ्यांचे हसत स्वागत करणे माझ्या हिंदुत्वात बसत नाही - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, wrote letter, Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई, १३ ऑक्टोबर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( CM Uddhav Thackeray ) यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात इंग्रजीतून खरमरीत पत्र लिहिले होते. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशाच पद्धतीने राज्यपालांना पत्र लिहून उत्तर दिलं आहे. राज्यपाल भगतसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचा विसर पडलाय का? असा सवाल केला होता. याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं म्हटलं आहे. मुंबईला पीओके म्हणणाऱ्यांचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्वात बसत नाही असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात लगावला आहे.

पाहा नेमंक काय आहे त्या पत्रात, पत्र जसेच्या तसे…

माननीय राज्यपाल महोदय ,
महाराष्ट्र राज्य यांसी –

जय महाराष्ट्र ,

महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.

महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही .

काय आहे नेमकं पत्र:

 

News English Summary: Governor Bhagat Singh Koshyari and chief minister Uddhav Thackeray appear to be on a course of confrontation over opening of temples and places of worship in Maharashtra. In a letter to Thackeray, the governor has asked him to forthwith announce the reopening of all the places of worship with all necessary Covid-19 precautions, while the CM was non-committal, saying his government has taken serious note of his suggestion and will soon take a decision.

News English Title: CM Uddhav Thackeray wrote letter to governor Bhagat Singh Koshyari News Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x