19 April 2025 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Breaking News | नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या

MPSC Recruitment 2020, MPSC Exam, November, Cancel

मुंबई, १३ ऑक्टोबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १ नोव्हेंबर २०२० आणि २२ नोव्हेंबर २०२० ला होणाऱ्या परीक्षाही रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा रद्द करुन पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

तत्पूर्वी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली होती. त्यामुळे रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

 

News English Summary: The Maharashtra Public Service Commission has also canceled the examinations on November 1, 2020 and November 22, 2020. Both the Maharashtra Engineering Service Pre-Examination and the Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group B Joint Pre-Examination have been canceled and postponed. The Maharashtra Public Service Commission has said that the dates of the examinations will be announced in due course. Maharashtra Public Service Commission has issued a leaflet in this regard.

News English Title: MPSC Recruitment 2020 Exam In November has also been Canceled News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या