22 November 2024 5:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ठरलं! नाथाभाऊंसोबत मोठे पदाधिकारी राष्ट्रवादीत जाणार | थेट विधानपरिषदही मिळणार?

BJP Senior leader Eknath Khadse, Entry into NCP

जळगाव, १४ ऑक्टोबर : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र ती चर्चा आता खरी ठरताना दिसत आहे. एकनाथ खडसे लवकरच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांद्वारे मिळत आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा जवळपास निश्चित समजला जात आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार आणि कार्यकर्ते हे राष्ट्रवादी प्रवेश करण्याची शक्यता आहे.

१७ तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
दरम्यान, एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये प्रवेश कधी करायचा या विषयावर एक बैठक पार पडली आहे. या बैठकीला एकनाथ खडसे यांचे समर्थक आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते देखील उपस्थितीत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या बैठकीत येत्या १७ तारखेला घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश करायचा असं ठरल्याची शक्यता आहे. सदर माहिती धुळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

शरद पाटील यांनी सेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सेनेचा राजीनामा देऊन शरद पाटील यांनी अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला होता. गेल्या काही महिन्यांपासून पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह आपण देखील राष्ट्रवादीत लवकरच प्रवेश करणार आहोत, अशी माहिती माजी आमदार पाटील यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे आणि फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार होते:
ग्लोबल हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्ताने एकनाथ खडसे आणि फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार होते. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी जामनेरमध्ये हजर होते. परंतु, एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळले. दरम्यान एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्या सुनबाई खासदार रक्षा खडसे या कार्यक्रमाला हजर होत्या. खडसे यांच्या गैरहजरीमुळे राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेलापुन्हा उधाण आले आहे.

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी?
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्या नंतर खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर देखील घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्राद्वारे मिळत आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता लागली आहे. खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्र मधील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये दाखल होण्याचे संकेत मिळत आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर हा भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का असू शकतो हे मात्र नक्की.

 

News English Summary: For the past several days, there has been talk in political circles that senior BJP leader Eknath Khadse is angry with the BJP. But that discussion seems to be coming true now. Official sources say that Eknath Khadse will soon join the NCP after defeating the BJP. Khadse’s entry into the NCP is considered almost certain. Meanwhile, many former MLAs and activists from North Maharashtra are likely to join the NCP following Eknath Khadse.

News English Title: BJP Senior leader Eknath Khadse entry into NCP soon said source News updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x