कोरोना घाई | मुंबई मनपाच्या स्थायी समितीला ६०० मलईदार प्रस्तावांच्या मंजुरीची घाई -सविस्तर वृत्त
मुंबई, १४ ऑक्टोबर : मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची पहिली बैठक २१ ऑक्टोबरला आहे. या एकाच बैठकीत कोट्यवधी रुपयांचे ६०० प्रस्ताव झटपट मंजुरीसाठी सादर होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपने चर्चेशिवाय प्रस्ताव मंजूर करणे चुकीचे असल्याचे सांगितले तर सत्ताधारी शिवसेनेने स्थायी समितीचे अध्यक्ष नियमाला धरुन निर्णय घेतील अशी भूमिका घेतली आहे.
नुकतीच स्थायी समितीच्या अध्यक्षपदी यशवंत जाधव यांची निवड झाली. आधीच्या कार्यकाळातही तेच अध्यक्ष होते. स्थायी समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे ११, भाजपचे १० (१० पैकी १ स्वीकृत), काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. नियमानुसार शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून येणाऱ्या व्यक्तीची स्थायी समितीवर पदसिद्ध सदस्यपदी नियुक्ती होते. सध्या शिक्षण समितीवर शिवसेनेच्या संध्या दोषी अध्यक्ष आहेत. त्यामुळे स्थायीमध्ये शिवसेनेचा वरचष्मा आहे. अशा परिस्थितीत बहुमताच्या जोरावर शिवसेना एकाच बैठकीत ६०० प्रस्तावांसाठी मंजुरी मिळवण्यास उत्सुक असल्याची चर्चा मनपा वर्तुळात जोर धरत आहे.
कोरोना संकटामुळे मागील सहा महिन्यांत स्थायी समितीची एकही बैठक झालेली नाही. अनेक विकास कामांसाठी स्थायीच्या निर्णयाअभावी निधी देण्यात आलेला नाही. याच कारणामुळे पहिल्या बैठकीवेळी स्थायी समितीसमोर निर्णयासाठी ६०० प्रस्ताव येणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. यात कोरोना संकटाच्या काळात केलेली कामं, अनेक प्रकल्प, विकास योजना, प्रशासकीय काम यांच्याशी संबंधित खर्चाचे प्रस्ताव असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. मात्र एकदम ६०० प्रस्ताव आले तर त्यावर चर्चा करणे अशक्य होईल आणि विनाचर्चेचे प्रस्ताव मंजूर करणे योग्य नाही, अशी भूमिका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी घेतली आहे.
कोरोना काळात मुंबई मनपाने केलेल्या अनेक आर्थिक व्यवहारांविषयी शंका उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांकडून कररुपाने मिळालेल्या पैशांचा विनियोग कसा होत आहे हे नगरसेवकांना कळणे आवश्यक आहे. कार्योत्तर मंजुरीसाठी आलेले प्रस्ताव विनाचर्चा मंजूर झाल्यास शंकांचे निरसन होणार नाही. संशयवाढीला जागा देण्यापेक्षा चर्चा करुन शंकांचे निरसन करावे अशी भूमिका भाजपने मांडली. भाजपच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना, स्थायी समितीच्या अध्यक्षांची जबाबदारी नियमानुसार काम करुन घेण्याची आहे. सर्व काही नियमांच्याआधारे करू, असे स्थायीचे अध्यक्ष आणि सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांनी दिली.
सध्या मुंबई मनपा तसेच मनपातील सर्व प्रमुख समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मनपात भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. युती तुटली असल्यामुळे भाजपने विरोधी पक्षनेतेपदाची मागणी केली आहे. ही मागणी मान्य करण्याऐवजी मनपाचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस (Congress) या पालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पक्षाकडे देण्यात आले आहे. या मुद्यावरुन भाजपने न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. ही तयार करत असतानाच भाजपने स्थायी समितीने निर्णयांच्या नावाखाली एकाच बैठकीत विनाचर्चा ६०० प्रस्तावांच्या मंजुरीची घाई करू नये असा आग्रह धरला आहे.
मुंबई मनपाचे २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे बजेट (budget) ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचे आहे. पालिकेचे सर्व आर्थिक निर्णय स्थायी समितीच्या मंजुरी नंतरच होतात. याच कारणामुळे मुंबई मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीवरुन शिवसेना आणि भाजप थेट संघर्षाच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, आज मुंबई महापालिकेत शिवसेना विरुद्ध आयुक्त यांच्यात ‘सामना’ सुरू झाला आहे. आयुक्त इक्बालसिंह चहल उद्धटपणे उत्तरं देत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. आयुक्तांनी महापौर, सभागृह नेत्या, नगरसेवकांचा मान राखावा, अन्यथा राज्य शासनात परत जावं, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आयुक्तांची तक्रार करणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
आज प्रभाग समित्यांची निवडणूक असल्यानं महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेनेचे नगरसेवक सकाळी सभागृहात पोहोचले. मात्र पालिकेतील अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे महापौरांसह शिवसेना नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. ‘आम्ही सकाळी वेळेत निवडणुकीसाठी पोहोचलो होतो. मात्र अधिकारी गैरहजर होते. डीएमसी, वॉर्ड ऑफिसरना वारंवार फोन केले. मात्र त्यांनी फोन उचलण्याचीही तसदी घेतली नाही,’ असं पेडणेकर म्हणाल्या.
News English Summary: The first meeting of the Standing Committee of Mumbai Municipal Corporation is on 21st October. It is reported that 600 proposals worth crores of rupees will be submitted for immediate approval in this single meeting. While the BJP said it was wrong to approve the proposal without discussion, the ruling Shiv Sena has taken a stand that the chairman of the standing committee will take a decision based on the rules. Recently, Yashwant Jadhav was elected as the Chairman of the Standing Committee. He was also the president during his previous tenure. Shiv Sena dominates the standing committee. The standing committee of Mumbai Municipal Corporation has 11 members from Shiv Sena, 10 from BJP (1 out of 10 approved) and 3 from Congress. The Standing Committee has one member each from NCP and Samajwadi Party.
News English Title: Six hundred proposals set to be passed in one standing committee meeting News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल