19 April 2025 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

आ. शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांची पुण्यात तासभर चर्चा | राजकीय चर्चा रंगली

BJP MLA Shivendraraje, Deputy CM Ajit Pawar

पुणे, १६ ऑक्टोबर : राजकीय वर्तुळात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते भेटले की चर्चांना उधाण येते. असेच काहीसे उधाण पुन्हा एकदा आले आहे. साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशाप्रकारे भेट घेतली होती.

त्यांच्या या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र ही भेट नेमकी कशासाठी आहे, याचं नेमकं कारणं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं शिवेंद्रराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज (१६ ऑक्टोबर) पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची भेट घेणार आहेत. तर दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोनाच्या स्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

तत्पूर्वी म्हणजे २७ जूनला सातारा जावळीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान, शिवेंद्रराजे यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, पवारांसोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, तर रखडलेल्या विकास कामांबाबत चर्चा झाल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले होते.

सातारा येथे एमआय़डीसीमध्ये बजाज कंपनीकडे चाळीस एकर जागा आहे. बजाज यांनी स्वतः कंपनी सुरू करावी किंवा जागा खाली करून दुसऱ्यासाठी द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे केली होती. महाराष्ट्र स्कूटरचा प्रकल्पाबाबत बजाज यांची लवकर भेट घेऊ, अशी ग्वाही शरद पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिली होती.

 

News English Summary: In political circles, the current leaders of the ruling party and the leaders of the opposition meet to discuss. Something similar has happened again. Satara BJP MLA Shivendra Raje recently met Deputy Chief Minister Ajit Pawar. Shivendra Raje and Ajit Pawar met at the Divisional Commissioner’s Office in Pune. The meeting lasted for about an hour. Shivendra Raje’s sudden visit to Deputy Chief Minister Ajit Pawar has started political discussions. Even before that, Shivendra Raje had met Ajit Pawar in this manner.

News English Title: BJP MLA Shivendraraje meet deputy CM Ajit Pawar at Pune News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या