30 April 2025 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

मोदी सरकारच्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला फारसा उपयोग नाही | मूडीजची टिपणी

Useless package, Economy growth rate, Moody report

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर : महिन्याभरापूर्वी जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल २२ वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये जून महिन्यात घट केली होती. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेजही पुरेसे नाही. त्यामुळे कमी वृद्धीचा धोका काही काळ राहणार आहे. म्हणूनच मूडीजनं बीएए २ वरून भारताची रेटिंग यापूर्वीच बीएए ३ केली होती.

मागील काही कालावधीपासून भारत आपल्या क्षमतेच्या तुलनेत कमी वृद्धी करत आहे . तसेच कर्जाचं ओझं वाढत असून कर्जाची परतफेड होण्यात अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे वित्तीय प्रणालीवर दबाव येणार असल्याचं भाकितही मूडीजनं केलं होतं. त्यानंतर अजून भर पडल्याने भारताची चिंता वाढली आहे.

केंद्राच्या दुसऱ्या पॅकेजकडून गुंतवणूकदारांना अपेक्षा होती. या पॅकेजमुळे नागरिकांचा खर्च वाढण्यास मदत होईल. मात्र, विकासदर वाढण्यासाठी याचा उपयोग होणार नाही, असे मुडीज्‌ या पतमानांकन या संस्थेने म्हटले आहे.

मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारने वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र, यामध्ये फक्‍त गरिबांना मदत आणि लघुउद्योगांना उत्पादन वाढविण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या होत्या. मागणी वाढण्यासाठी या पॅकेजमध्ये फारसे काही नव्हते. त्यामुळे मागणी वाढण्यासाठी नव्या पॅकेजची मागणी बऱ्याच क्षेत्रांकडून करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांची उचल आणि राज्य सरकारसाठी 12 हजार कोटी रुपयांच्या कर्जाची घोषणा केली होती.

सरकारने जाहीर केलेले पॅकेज राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 0.2 टक्‍के आहे. त्यामुळे याचा अर्थव्यवस्थेला आधार मिळण्यासाठी फारसा उपयोग होणार नाही, असे मुडीज्‌ने यासंदर्भात जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. मुळात केंद्र सरकारवरील कर्ज राष्ट्रीय उत्पन्नाच्या 72 टक्‍के होते. आता हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 90 टक्‍के होणार आहे. केंद्र सरकारला कर्जाच्या माध्यमातून रक्‍कम उभी करण्यासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आता कर्ज वाढविणार नसल्याचे सांगितले आहे.

केंद्र सरकारने कामगार आणि कृषी क्षेत्रात काही सुधारणा जाहीर केल्या आहेत. या संदर्भातील विधेयक संसदेने मंजूर केले आहे. या सुधारणांची परिणामकारक अंमलबजावणी केल्यानंतर दीर्घ पल्ल्यात अर्थव्यवस्थेला गती देण्यास मदत होईल, असे मुडीज्‌ने म्हटले आहे.

 

News English Summary: The latest round of stimulus measures announced by the government will have a minimal impact on growth and highlight India’s limited budgetary firepower, which proved to be credit negative, according to global rating agency Moody’s. “Notwithstanding the fiscal prudence of the measures, the small scale of the stimulus highlights limited budgetary firepower to support the economy during a very sharp contraction, a credit negative,” it said in a note on Thursday.

News English Title: Useless for package growth rate says Moody report News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या