बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय | अन्यथा मुंबई पोलीस - गृहमंत्री
मुंबई, १७ ऑक्टोबर : बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शन यावरुन राजकारण देखील तापले आहे. यावर कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही एक महत्वाची माहिती दिली आहे. एनसीबीने तपास केला नाही तर मुंबई पोलीस तपास सुरू करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय आहे? याबाबत तपास सुरू आहे. भाजप नेत्यांच्या ड्रग कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
Bengaluru Police have come here to probe drug connection of Vivek Oberoi & filmmaker Sandip Ssingh. But NCB is not taking up the investigation. We’ll request NCB to investigate the drug connection & if they don’t, Mumbai Police will do it: Maharashtra Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/fXqGdub0iT
— ANI (@ANI) October 16, 2020
याआधी सचिन सावंत यांनी केलेली तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासासाठी एनसीबीकडे पाठवली होती. मात्र एनसीबी याचा तपास का करत नाही, ते कुणाच्या दबावाखाली आहेत का? असा सवाल उपस्थित होत होता. सचिन सावंत यांनी दिलेली दुसरी तक्रारही आपण एनसीबीकडे तपासासाठी पाठवत आहोत, जर एनसीबीने तपास केला नाही तर पोलीस याचा तपास करतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
सावंत म्हणाले की, भाजप आणि बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे आणि माहितीवर एनसीबीने कार्यवाही केली नाही. चित्रपट निर्माता संदीप सिंह आणि विवेक ओबेरॉय यांचे नाव येत होते. ड्रग्ज कनेक्शनसंदर्भात बंगळुरू पोलिसांनी मुंबईत येऊन अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांना वेळ मिळत नाही, याचे आश्चर्य वाटते.
कर्नाटकमध्ये भाजपच्या प्रचारात सामील झालेली अभिनेत्री रागिनी द्विवेदी ही चंदन ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये पकडली गेली आहे. तिच्याबरोबर १२ लोकांवर ड्रग्ज पेडलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १२ लोकांमध्ये आदित्य अल्वा नावाचा व्यक्ती असून तो फरार आहे. तो विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे. ही सर्व माहिती चौकशीकरिता दिली होती, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र भाजप कार्यालयात संदीप सिंहने ५३ वेळा कोणाला फोन केला याचे उत्तरही अजून मिळालेले नाही, असेही सावंत म्हणाले.
News English Summary: Bengaluru Police have come here to probe drug connection of Vivek Oberoi & filmmaker Sandip Ssingh. But NCB is not taking up the investigation. We’ll request NCB to investigate the drug connection & if they don’t, Mumbai Police will do it said Maharashtra Home Minister Anil Deshmukh.
News English Title: Mumbai Police will investigate Bollywood and BJP drugs connection News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS