माजी आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांविरुद्ध शेतकऱ्याची बॅनरबाजी | फसव्या कर्जमाफीवरून संताप
बुलढाणा, १८ ऑक्टोबर : आस्मानी संकटामुळं जगाचा पोशिंदा अर्थात शेतकरी कायमचं अडचणीत येत असतो. या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारं नेहमीच कर्जमाफीची लोकप्रिय घोषणा करतात. प्रत्यक्षात त्याचा फायदा किती शेतकऱ्यांना होतो हा प्रश्न कायमच राहतो. अशाच एका कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्याने उद्विग्न होऊन यापूर्वीच्या फडणवीस आणि आत्ताच्या ठाकरे सरकारचे वाभाडे काढले आहेत.
बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राजकीय नेत्यांबद्दल स्पष्टपणे भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या शेताच्या बांधावर आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा फ्लेक्स लावून शेतकरी बांधवांची खंत शेतकरी नीलकंठ लिपते यांनी व्यक्त केली. 2 एकर शेतीचे मालक असलेल्या नीलकंठ यांच्यावर सध्या बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्ज आहे. संग्रामपूर येथील शाखेतून त्यांनी शेतीवर कर्ज घेतलं होतं, ते आता 1.48 लाख रुपये एवढं आहे. नीलकंठ यांनी फडणवीस सरकारच्या काळातही कर्जमाफीसाठी अर्ज केला होता, त्यानंतर आता ठाकरे सरकारच्या काळातही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे, उद्विग्न होऊन त्यांनी ही बॅनरबाजी केली आहे.
‘फसवी कर्जमाफी’; शेतात फ्लेक्स लावत शेतकऱ्यानं फडणवीस, ठाकरे सरकारचे काढले वाभाडे
ठिकाण – बुलढाणा (संग्रामपूर – भिलखेड) pic.twitter.com/OqTyHWmU6t
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 18, 2020
सरकार दरबारी वारंवार खेटे घालूनही शासकीय योजनांचा फायदा मिळत नसल्याने वैतागलेल्या लिपते यांनी आपल्या शेतातच मोठा फ्लेक्स लावत त्यावर ‘फसवी कर्जमाफी’ या मथळ्याखाली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो छापत त्यामध्ये ‘या दोन्ही सरकारच्या कालावधीत माझी कर्जमाफी झालीच नाही, त्यामुळे मी एक त्रस्त शेतकरी’ असा संदेश लिहिला. त्याखाली त्यांनी आपलं नाव, संपर्क क्रमांक आणि संपूर्ण पत्ताही लिहिला.
News English Summary: A smallholder farmer in Sangrampur taluka of Buldhana district has clearly expressed his feelings about political leaders. Farmer Neelkanth Lipte expressed the grief of the farmers by putting a photo of his grandmother and former Chief Minister on the bund of his farm. Neelkanth, who owns a 2 acre farm, is currently indebted to Bank of Maharashtra. He had taken a loan on agriculture from the Sangrampur branch, which is now Rs 1.48 lakh. Neelkanth had applied for loan waiver even during the Fadnavis government, but now he has not received loan waiver even during the Thackeray government. So, out of curiosity, they have made this banner.
News English Title: Fraudulent loan waiver Buldhana Farmers hold suffering banner on Fadnavis and Thackeray government News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार