22 November 2024 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

साताऱ्यातील दोन्ही राजे भाजपमध्ये | तरी भाजपमध्ये राजकीय अस्वस्थता?

Satara BJP Politics, MP Udayanraje Bhonsale, MLA Shivendraraje

सातारा, १८ ऑक्टोबर : राजकीय वर्तुळात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते भेटले की चर्चांना उधाण येते. असेच काहीसे उधाण पुन्हा एकदा आले होते. साताराचे भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली होती. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यापूर्वीही शिवेंद्रराजे यांनी अजित पवार यांची अशाप्रकारे भेट घेतली होती. त्यानंतर वृत्त पसरताच अजित पवारांनी भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढू नये असं स्पष्टीकरण दिलं होतं.

मात्र त्यांच्या या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा सुरु असल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र ती भेट नेमकी कशासाठी आहे, याचं नेमकं कारणं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं शिवेंद्रराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात साताऱ्यातील दोन राजे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भारतीय जनता पक्षातअसले भाजपमधील अस्वस्थता वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असणाऱ्या मित्रत्त्वात सातत्याने भर पडत आहे. त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी वाढत असलेली सलगी भाजपला खटकणारी असली तरीही काही बोलता येत नाही, अशी भाजपची अवस्था झाली आहे.

उदयनराजे भोसले यांच्यामुळे पक्षाला मोठी ताकद मिळेल, केवळ साताराच नव्हे तर राज्यात त्यांचा फायदा मिळेल, असा भाजपचा कयास फोल ठरला आहे. मुळात उदयनराजे नेहमीच पक्षापेक्षा लोकांना आणि व्यक्तिगत संपर्काला महत्त्व देतात. त्यामुळे भाजपला अपेक्षित असे काहीच घडत नसल्यामुळे दोन्ही राजांच्या भूमिकेमुळे भाजप हतबल होत चालला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व स्थापनेपासून कायम आहे. त्याउलट भाजपची स्वतःची ताकद नाही. पक्षातील मूळ कार्यकर्त्यांपेक्षा पक्षामध्ये आलेली ताकदवान नेतेमंडळी हीच पक्षाची ताकद राहिली आहे. एक आमदार तर दुसरे राज्यसभेचे खासदार असले तरी आता सातारा शहर व तालुक्‍यावर भाजपची पकड आहे, असे कागदावर म्हणता येईल. निवडणुकीपूर्वी भाजपला आलेला फुगवटा पुढे टिकला नाही असंच म्हणावं लागेल.

 

News English Summary: In the stronghold of NCP, two kings from Satara, MP Udayan Raje Bhosale and MLA Shivendra Singh Raje Bhosale are in the Bharatiya Janata Party. Shivendra Singh Raje Bhosale’s friendship with Deputy Chief Minister Ajit Pawar is constantly increasing. Even though his growing closeness with the NCP is bothering the BJP, the BJP is in a dilemma.

News English Title: Satara BJP Political fact MP Udayanraje Bhonsale and MLA Shivendraraje News updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x