22 November 2024 7:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

विरोधक तर बिहारमध्ये आहेत | महाराष्ट्रावरील संकटावेळी शरद पवार धावून येतात

Beed Guardian Minister Dhananjay Munde, Tour of Beed district, Crop damage caused by rains

बीड, १८ ऑक्टोबर : एकाबाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उस्मानाबादमधील अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहेत. तुळजापूरमध्ये पाहणी केल्यानंतर ‘येत्या 10 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी’, अशी मागणी करणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहे.

परतीचा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी शरद पवार उस्मानाबादेत दाखल झाले आहे. शहरात दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ‘शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेऊन भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत’ असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे हे बांधा बांधावर जाऊन पाहणी करत आहेत, त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा ही आज उस्मानाबाद, लातूर दौरा सुरू आहे. राज्यावर आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी पुर्ण हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडीचे सर्वच पालकमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करण्यासाठी बांधा बांधावर जात आहेत.

या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे. ते म्हणाले की, ‘सध्या विरोधक महाराष्ट्रात कुठे आहेत? ते तर बिहार मध्ये आहेत .जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट येतात तेव्हा तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरदचंद्र पवार मदतीला धावून येतात. मग ते सत्तेत असो अथवा नसो ‘ असे पालकमंत्री धनंजय मुंडे या वेळी बोलतांना म्हणाले.

 

News English Summary: Minister Dhananjay Munde, the Guardian Minister of Beed district, is visiting the dam to inspect the crop damage caused by rains in Beed district. Similarly, National President of NCP Sharad Pawar is visiting Osmanabad, Latur today. Due to this catastrophic crisis in the state, the farmers are in a state of panic. The Chief Minister and all the Guardian Ministers of the Maha Vikas Aghadi and the Chief Minister of the state are also going to the dam to inspect the losses of the farmers.

News English Title:  The Guardian Minister Dhananjay Munde on tour of Beed district to inspect the crop damage caused by rains News updates.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x